पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. पुण्याहून आलों त्या वेळी आजोबा चांगलं तुला ह्मणाले की,, जिजाई, दोन्ही मुलें येथे ठेवून जा, पण तूं काही ऐकलें नाहीं. जिजाई-अगे, माहेर तें माहेर, आणि सासर तें सासर. सासरी आपली सत्ता असते. हे कसे झाले तरी आपले घर आहे. आज नाहीं उयां चांगले दिवस येतील. माहेरी गेलें ह्मणजे भावजयांनी कपाळाला आंब्या घालाव्या, भावांनी कमजास्त बोलावें, भावांच्या मुलांनी तुमच्याशी भांडणतंटे करावेत, त्यापेक्षा येथेच राहिले तर काय वाईट ? परवां त्यांनी आपल्याबरोबर गोणीभर जोंधळे दिले. पण येथें गोणी आणली, आणखी मी किंचित् बाहेर मात्र गेलें,तों गोणीभर दाणे भिका-यांनां यजमानांनी वांटून टाकले. आपली मुलेबाळें उपाशी मारतो, आणखी लोकांच्या मट्यावर दाणे घालतो. असा बाप जगांत तरी असेल काय ? पूर्वजन्मींचा सूड उगवून घेतात, आणखी दुसरे काय ? (तुकाराम धोतरांत पीठ घेऊन एका बाजूने चोरून प्रवेश करून बाजूला उभा राहतो, आणि मंबाजी गोसावी दुस-या बाजूने प्रवेश करतो. ) मंबाजी-आल्लक. जिजाई-मेलं भिकाऱ्यांनी तर भंडावून सोडलें अगदी ! या मेल्या गोसावड्यांनां तर आयती पिठे लागतात. अजून पीठ दळून नाही आले बाबा. मंबाजी-क्या आम्मा, रोज पिसनेकेवास्ते देते हो तुम बडे श्रीमान हो. जिजाई-मेल्या गोसावड्या, तुलारे कशाला इतक्या पंचायती हव्यात ? पीठ अजून दळून आले नाही म्हटलें, आपलें चालतें झाले. आम्ही श्रीमंत असूं की गरीब असूं, आह्मी आमच्या घरचे. मंबाजी-ऐसा नहि अम्मा. मै साधु है. कुयी गरीब होता, तो मै उस्कू आटा, चावल, रोज देता है. मै जातसे भीक मंगके लाता है. तुम गरीब हो तों मै तुमकूभी महादेव-अग आई, तूं यांनां ओळखले नाहीस. हे आपले