पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. अंक पहिला. प्रवेश १ ला. स्थळ-देहू येथील तुकारामाचें घर. (जिजाई, महादेव आणि काशी बसली आहेत.) काशी-आई, मला भूक लागली. महादेव-आई, माझे प्राण भुकेनें कासावीस होत आहेत बरें ! (गडबडा लोळतो.) काशी-आई, मी रात्रीं कांहीं खाल्लं आहे काय ? तूंच सांग बरें! जिजाई-अशी सोन्यासारखी बाळें आई आई करून पोटाला गोळाभर अन्न मागतात, पण ते सुद्धा आमच्या घरांत नाही. बाळांनों, आतां घरीं यावयाची वेळ झाली आहे. आतां बरोबर कांहीं तरी खावयाला घेऊन येतील. तोपर्यंत ही मेथीची भाजी उकडून तुम्हांला घालते; ती तुम्ही थोडी थोडी खा, पण घरांत मेलं सरपण सुद्धा नाही. सगळ्यापुढे उपाय चालतो, पण मेल्या या चुलखंडापुढे कांहीं शहाणपण चालत नाही. या मुलांनां कालपासून अन्न नाही, आणि मी तर आज आठ दिवसांची उपाशी आहे. या दुष्काळांतून आह्मी वांचूं, असें कांही वाटत नाही. मेली शेराची धारण! कधी कोणी ऐकली तरी असेल का? काशी-आई, याच्यापेक्षां चार दिवस पुण्यास अजोळी चनाम ? तेथें मेली पोटाची तरी काळजी नाही. परवां आपण