पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. १३९ करणार नाही अशी पांडुरंगाची शपथ घ्यावी. मग रामेश्वरमहाराजांना जसे वाटत असेल त्याच्याबाहेर आह्मी नाही. रामेश्वर-बस्स. हेच करावयाचें. तुकाराम, ज्याप्रमाणे जैमिनीने केलेले भारत व्यासाने बुडवून टाकलें, अथवा श्री शंकराचार्यांनी ज्याप्रमाणे जैनमताच्या ग्रंथांना जलसमाधी दिली, त्याप्रमाणे आम्ही तुझे आजपावेतों केलेले सर्व ग्रंथ पाण्यांत बुडवून टाकणार. तुझ्या अभंगांच्या वह्यांचे एक गांठोडें कर. त्याच्यावर वर आणि खाली चांगल्या मोठाल्या दगडी चिपा पालन त्या इंद्रायणीच्या डोहांत बुडवून टाकल्याबद्दल देहूचे पाटलाचा आह्मांला दाखला आणून दाखीव. मंबाजी- ठीक, ठीक. उत्तम आहे. तुकाराम-पण महाराज जैमिनीच्या कवितेत एक अश्वमेध ग्रंथ व्यासाने राखिला. जैनमतांचे ग्रंथांत आचार्यांनी अमरकोश ठविलेला आहे. मंबाजी-गुलामाची माहिती बघा कशी आहे ती. जातीचा शूद्र पण माहितीने आम्हा ब्राह्मणांना खालीं पहायला लावील. खरोखर मला सुद्धा आजपावेतों माहीत नव्हतें की व्यासाने कोणता ग्रंथ राखला, आणखी श्रीशंकराचार्यांनी कोणता ग्रंथ राखला! रामेश्वर-तुकाराम, तुझें म्हणणे काय आहे यावर ? तुकाराम-विनति म्हणून इतकीच की, श्रीकृष्णाची बाळक्रीडा आणि नाटाचे अभंग एवढी दोन प्रकरणे राखण्याची आज्ञा व्हावी. रामेश्वर-तें कांहीं होणार नाही. सर्व ग्रंथ इंद्रायणीचे डोहांत बुडवून टाकावे अशीच आमची आज्ञा आहे. चला आतां आपण पुण्यास नागनाथाचे दर्शनास जाऊं. (तुकारामाशिवाय सर्व जातात.) तुकाराम-ॐ तत्सदिति सूत्राचे सार । कृपेचा सागर पांडुरंग ॥१॥ हरिः ॐ सहित उदत अनुदत । प्रचुरीश्वरासहित पांडुरंग ॥२॥