पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ श्रीतुकाराम. रामेश्वर-जातीचा कुणबट, ज्ञानशून्य असतां उगीच पारखांड मत माजविलें आहे काय ? आतां देहूचा पाटील गांवांत तुला कोणाला भिक्षा तरी घालून देईल काय ? तुकाराम-म्हणूनच आपल्याला मी शरण आलो आहे. देहूंत राहण्याकरितां नव्हे, पण आपण ब्राह्मण आहांत म्हणून. आतां महाराजांची काय आज्ञा आहे ? रामेश्वर-आजपासून तूं कवित्व करूं नये अशी आमची तुला आज्ञा आहे. (तुकाराम हंसतो.) दांत काढायला काय झाले ? तुला था वाटली काय ? तुकाराम-आपण अपरसूर्य ब्राम्हण आज्ञा करितां त्यापेक्षा आजपासून कवित्व करणे सोडून देतो. परंतु आजपावेतों ज्या कविता केल्या आहेत त्यांची काय वाट ? श्रीपांडरंगाने स्वप्नांत येऊन आज्ञा केल्यावरून आजपावेतों काही तरी कवितारूपानें बडबड केली. ( सचिंत उभा रहातो.) । मंबाजी-हे सांगण्याची काही गरज होतीका ? पण लोकाला दिसले पाहिजे की, हाच कायतो पांडुरंगाचा भक्त ! पांडुरंग याच्या स्वप्नांत येत असतो. हे मोठे साधुच पडले की नाहीं ! माझ्या नाहीं स्वप्नांत पांडुरंग येत तो ? प्रत्यक्ष रामेश्वरमहाराज त्यांच्या सुद्धा स्वप्नांत पांडुरंग येऊन काही चमत्कार दाखवीत नाही. इतकें कशाला ? याचे अभंग आपण आतां नाहीसे करणार आहांत, मग पांडुरंगाने यावे की नाही आपले स्वप्नांत ? अहो, सगळ्या थापा. त्याखेरीज याचे ढोंग माजणार कसे ? बरें तें असो (रामेश्वरास व दोघां संन्याशांस एका बाजूला करून) काय, आता केलेल्या अभंगांच्या वह्यांचं काय करितां ? नित्यानंद-मला वाटते जाळून टाकाव्यात. सदानंद-जाळू नयेत. त्यांत श्रुतीचे अर्थ आहेत. पुरून टाकाव्यात. । मंबाजी-मला वाटते याने हातकलम करून यावा, पुढे अभंग