पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. १३७ कडून जेव्हां कान पिळले गेले तेव्हां आले आतां शुद्धीवर. सोनाराकडून कान टोचला गेला पाहिजे. सदानंद-यावेळी यानें तर ब्राह्मणांची स्तुतिच केली. बाकी आह्मी ब्राम्हण तसेच आहोत. काही कमी नाही. याला आतां चांगली शिक्षा झाली पाहिजे. नित्यानंद-आतां स्तुति केली यांत काही अर्थ नाही.. ती खरी नव्हे. देहूच्या पाटलानें गांवांतून हाकून दिला ह्मणून ही स्तुति आहे. आजपावेतों रामेश्वरमहाराजांचे दर्शनास नाहीं कधी आलांत! रामेश्वर-कायरे तुकाराम, तूं कीर्तन करतोस, कवित्व करतोस, तुझ्या कवितेत श्रुतिस्मृतीचे अर्थ उमटतात. तूं जातीचा शूद्र, तुला वेदोक्त मार्गाचा आधिकार नाही. तुझें करणे शास्त्राविरुद्ध आहे. तूं आणखी तुझें कीर्तन ऐकणारे श्रोते उभयतां नरकांत जाल. तुकाराम-हे दोन्ही यतिमहाराज आमचे कर्तिन ऐकावयास आले होते, यांना तरी नरकयातना देऊ नका. नित्यानंद-कर्ममार्गाचा उच्छेद करण्यास प्रवृत्त झालांत काय ! नाममहात्म्य प्रतिपादन करून भोळ्या भाविक जनाला भ्रष्ट करीत असतां काय ? सदानंद-कितीएक लोक जातीचे ब्राम्हण, परंतु या तकारामाच्या जे आहेत ते पायां पडतात. हा काही त्यांना नको म्हजत नाही. आम्हीं लोहोगांवी हा कीर्तन करीत असतां प्रत्यक्ष पाहिले. मंबाजी-आतां ब्राह्मण पायां पडायाला लागले तर शूद्रांचें वरच झालें. निदान तकोबाचें तरी बरेंच झाले आहे. तुकोबा आता ब्राह्मण बनत चालला आहे. कांदे लसूण उघड उघड खात नाही. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो, मुद्रा लावतो, माळा चालतो, आमच्या देहस नुसते बंड माजविलें आहे. जो उठतो ता तुकाराम तुकाराम करतो. आणखी मी मंबाजी बसलों कोकलत