पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. पुरवणी. (पान ५३ वरून पुढे चालू.) अंक २ रा. प्रवेश ४ था. स्थळ-वाघोली येथील रामेश्वरभटाचें घर. (तुकाराम प्रवेश करितो.) तुकाराम-(एकीकडे ) आलोंच आपण वाघोली गांवांत. रामेश्वरमहाराजांचें हेंच घर. वाघोलीचे पाटलानें देहूचे पाटलास अशी ताकीद-चिटी पाठविली आहे की, तुकाराम रामेश्वरभटजीस शरण आल्यास बरें, नाहीतर त्याजला देहूंतून हाकून द्यावें. ब्राह्मणाला शरण जाण्यास हा तुकाराम एका पायावर तयार आहे-( रामेश्वरभट, मंबाजी गोसावी, व दोन संन्यासी प्रवेश करितात, तुकाराम त्यांना नमस्कार करितो.) रामश्वर-कायरे तुकाराम, तुला देहूच्या पाटलाने ताकीदपत्र दिले किंवा नाही ? तुकाराम-होय महाराज, दिले. ह्मणूनच आपल्या चरणाचें दर्शन घेण्याकरितां आलो. आपण सर्व वणीत श्रेष्ठ, मंत्रविद्येचे माहेरघर, तपश्चर्यची केवळ मूर्ति, सर्व तीर्थांचें आदिदैवत, वेदांचे केवळ कवच, समुद्राचे आचमन करणारे, आपली चरणमुद्रा प्रत्यक्ष भगवान आपल्या वक्षस्थळावर भूषण ह्मणून धारण कारतात, असे आपण परमपूज्य आहांत, तेथे हा तुकाराम आपली आज्ञा कशी मोडणार ? देहूच्या पाटलाने मला आपली भेट घेऊन देहूंत राहण्याची परवानगी घेऊन ये ह्मणून ताकीद केली आहे. मंबाजी-आतां कसा मऊ आला. हेच जर आह्मीं सांगितले असते तर आला असता का साधूबोवा ? आज कोठे, गेले भामानाथावर, आज कोठे, गेले पंढरीला, गेले आळंदीला. पाटला