पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मोकळा होतो. जाती, कूळ, नाम, रूप, यांना आज तिळांजळी देतो. त्याचे शरीर त्याला अर्पण करून टाकतो. सर्व कर्मांचा आज घटस्फोट करून टाकतो. सव्यापसव्य आजपासून बंद करतो. आपल्या हातांनी पांडुरंगाच्या पायावर पिंड देऊन पितरांच्या ऋणांतून मोकळा होतो. सर्व जग विष्णुमय झाले. जनी जनार्दन अभेद झाला. आनंदी आनंद झाला. पांडुरंगरूपी दीप सर्व शरीरांत प्रकाशमान झाला. अभंग तुका उतरला तुकीं ॥ नवल झालें तिहीं ॥१॥ नित्य करितों कीर्तन ॥ हेंचि माझें अनुष्ठान ॥२॥ तुका बैसला विमानीं ॥ संत पाहाती लोचनीं ॥३॥ देव भावाचा भुकेला ॥ तुका वैकुंठासी नेला. ॥ ४ ॥ ॥२॥ डोळां भरिलें रूप ॥ चित्ता पायां संकल्प ॥१॥ अवधी घातली वांटणी ॥ प्रेम राहिले कीर्तनीं ॥२॥ वाचा केली माप ॥रासी हरिनाम अमुप ॥ ३ ॥ भरुनियां भाग ॥ तुका बैसला पांडुरंग ॥४॥ (तुकारामाचा दिव्य प्रकाश पडतो. सर्वांची तंद्रि लागते. सर्व डोळ झांकतात. तुकाराम विमानांत बसून वैकुंठास जातो. ) अंक पांचवा समाप्त. समाप्त.