पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ श्रीतुकाराम. आणि पाताळात मिळणार नाही. तुम्हांस जगाचे आघात सोसले पाहिजेत, वन-पट्टण एक भास झाला पाहिजे, सुखदुःखाची आठवण न ठेवितां आनंदाने आणि कौतुकानें नाचले पाहिजेजोपावतों तुम्हाला मागची आशा सुटत नाही, तोपावेतों या संतपणाच्या नादी लागू नका. उघडच आहे की, जर कुलस्त्रीला व्यभिचार कर्तव्य असेल तर तिने तळहातावरच शीर घेतलें पाहिजे. तसे हे संतपण आहे. आपल्या हाताने संसाराला आग लाविली पाहिजे. पतंगाप्रमाणे धीट होऊन दिव्यावर झडप घातली पाहिजे. अभंग. रज्जुसाकार ॥ भासयेलें जगडंबर ॥१॥ म्हणोनि आठवती पाय ॥ घेतों आला बलाय ॥ २ ॥ दृश्य द्रुमाकारलाणी ॥ केलों सर्वस्वासी धणी ॥३॥ तुकी तुकला तुका ॥ विश्वी भरोनी उरला लोकां ॥४॥ ( कंठ भरून येऊन ) येतो मी आता. तुम्ही सर्वांनी माझी बोळवण केलीत याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. तुमचे कल्याण होवो. फार वेळ झाला. पांडुरंग माझी वाट पहात उभा आहे. श्रीविठ्ठल मला वैकुंठाला नेण्याकरितां स्वतः आले आहेत. अंतकाळी मला विठ्ठल पावला. येतों मी आता. तुमचे वाडवडिलांस या बालकाचा नमस्कार सांगा. त्यांना सांगा की आतां मी परत येणार नाही. मजकडून जर तुमचा कांहीं चुकून अपराध झाला असेल, कठोर शब्दाने जर मी कोणाचें मन दुखवले असेल, न कळून कोणाचा अपमान केला असेल, तर त्याची मला क्षमा करा. माझी आठवण ठेवा. या तुमच्या तुकारामाला विसरू नका. सुजनहो, आज रोजी या जन्ममरणाचे सुतक फेडून टाकतो. वैराग्याच्या शेणी शरीराला लावून ब्रम्हाग्नी चेतवून ब्रम्हत्वाला मिळून जातो. छत्तीस तत्त्वांचे बनलेलें में शरीर त्याचा घट आज पांडुरंगाच्या चरणावर फोडून हरिहराच्या नांवाने बोंब मारून