पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३३ अंक ५ वा. वाटेने नामस्मरणाचे योगाने पावलोपावलीं यज्ञ केल्याचे पुण्य. “मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांसी.” ज्यांचे दोषाला परिहार नाही, ज्यांच्या दोषाला शास्त्रांत प्रायश्चित्त नाही, त्यांनी पंढरीस जावें, म्हणजे ते दोषमुक्त होतील. जर तुझांस जन्मास आल्याचे सार्थक करावयाचे असेल तर एक वेळ तरी पंढरीस जा. जे श्रीविष्णूचें नगर, जेथील नरनारी चतुर्भुज, जेथे सुदर्शन घरटी करीत आहे, आणि जेथे काळाची गति कुंठित झाली आहे, अशा स्थलाचे वर्णन करायला माझी मंद मति चालत नाही. ज्याला माझ्या भाषणाची सत्यता वाटत नसेल, ज्याचा माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल, तो जन्मांतरीचा अधम आहे असे समजावें. नामस्मरणाचे योगाने मी आपली काया ब्रम्हभूत करितों, इतकंच नाही; पण घोंटवीन लाळ ब्रह्मज्ञान्याहातीं ॥ मुक्तां आत्मस्थिति सांडवीन ॥१॥ ब्रह्मभूत होते कायाच कीर्तनीं ॥ भाग्य तरी ऋणी देव ऐसा ॥२॥ तीर्थभ्रामकासी आणीन आळस ॥ कडु स्वर्गवास करिन भोग ॥३॥ सांडवीन तपोनिधा अभिमान ॥ यज्ञ आणि दान लाजवीन ॥ ४॥ भक्ति भाग्य प्रेमा साधीन पुरुषार्थ ॥ ब्रह्मींचा जो अर्थ निज ठेवा ॥५॥ धन्य झणवीन इह लोकी लोकां ॥ भाग्य आह्मीं तुका देखियेला ॥६॥ आजपावेतों शेकडों लोकांनी माझी निंदा केली आणि शेकडों लोकांनी माझी स्तुति केली; कित्येकांनी माझी पूजा केली आणि कित्येकांनी मला मारिलें नाहीं नाहीं ती माझी भंडाई झाली; पण मला या सर्व गोष्टींपासून आनंदही नाही आणि दुःखही नाही. मी दोहोंपासून वेगळा. ॥ अवघे पावे नारायणीं। जनार्दनीं तुक्याचें ॥ तुम्हांस संतपणा पाहिजे असल्यास तो कांहीं बाजारांत धनाच्या राशी ओतल्या तरी मिळणार नाही, स्वर्गांत मिळणार नाही,