पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ श्रीतुकाराम. केला की, जर या दादोजीचे तडाख्यांतून वांचलों तर या सत्पुरुषाची अनन्यभावें सेवा करावयाची. सदानंद-चला तर आतां. आपल्या उभयतांचें एक मत झालें हे फार उत्तम झालें. (जातात. तुकाराम भजन करीत येतो. रामेश्वरभटजी, मबाजी, नित्यानंद, सदानंद, वगैरे सर्व मंडळी टाळमृदंग वाजवीत विठ्ठलनामाचा जयघोष करीत तुकारामाबरोबर येतात.) तकाराम-RTISTANTAR V त कास घालोनी बळकट ॥ झालों कळिकाळासी नीट ॥ केली पायवाट ॥ भवसिंधूवरूनि ॥१॥ यारे यारे लहानथोर ॥ याति भलते नारीनर ॥ करावा विचार ॥ नलगे चिंता कोणासी ॥२॥ कामी गुंतले रिकामे ॥जपी तपी येथे जमे ॥ लाविले दमामे ॥ मुक्त आणि मुमुक्षा ॥३॥ एकंदर शिका ॥ पाठविला इहलोका ॥ आलों ह्मणे तुका ॥ मी नामाचा धारक ॥४॥ अहो भाविक जनहो, मी शेवटी काय सांगतों तें चित्त देऊन ऐका. तुझी निरनिराळी मतमतांतरे शोधीत बसाल तर तुम्हांस खऱ्या देवाचा उकल कधीच पडणार नाही. तुमचें अल्प आयुष्य ताबडतोब आणखी व्यर्थ निघून जाईल. एक पांडुरंगाचे नामावर विश्वास ठेवून त्याचेच स्मरण करा. विनाकारण कुतर्क काढून वाद घेणाऱ्या लोकांची संगति सोडून द्या. कलियुगी आणि त्यांतही मृत्युलोकी नामस्मरणासारखा सोपा मार्ग नाही. वैष्णव वीरांचा हा नामस्मरणाचा अथवा कीर्तनाचा सोहळा पाहून, त्यांचा टाळमृदंगाचा आणि पताकांचा थाट पाहून, कलिकाळांची वाट बंद पडली. हे सुख पाहून ब्रह्मादिकांचे तोंडाला पाणी सुटलें. ते म्हणतात, मृत्युलोक धन्य धन्य आहे! काशीत मृत्यु आल्यानंतर मुक्ति. गयेस जाऊन विष्णुपदावर पिंड पडल्यावर पितर मुक्त होतात. पण इतकें उधारखाते पंढरीस नाहीं. पंढरीचे