पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० श्रीतुकाराम. टाकलें.कोणी वेदत्रयांच्या सांगडी करून, अहंभावाचे धोंडे कमरेस बांधले, ते सगळेच्या सगळेच मदमत्स्याच्या तोंडात पडले. कोणी तारुण्याचे बळ बांधून मदनाचे कासेस लागले, ते विषयरूप सुसरीने चावून त्यांची हाडें चूर करून टाकली. हिच्यामध्ये वैराग्याची नाव घालता येत नाही. विचाराचा तागा लागत नाहीं. ह्या माया-नदीतून पार पडणे जिवावरचे आहे. कसे म्हणाल तर अपथ्य करणाराला जशी व्याधी, किंवा साधूला जशी दुर्जनाची बुद्धि, ही जर कांहींच अपाय करणार नाहीत, किंवा घरी चालून आलेली सिद्धि जर विषयलोभी टाकून देईल, चोराची जर सभा भरेल, अथवा मत्स्याला जर गळ गिळवेल, भित्र्याला जर भूत भिऊन पळेल, तर हे जीव मायेच्या पैलतीरास पोहोंचतील. सारांश, विषयी पुरुषाला ज्याप्रमाणे स्त्री जिंकवत नाहीं-म्हणजे तिचा शब्द मोडवत नाहीं-त्याप्रमाणे माया-नदी जीवांना तरवत नाहीं. जे सर्व भावेंकरून पांडुरंगाला भजतात, ज्यांच्यापुढे सद्गुरु हा नावाडी आहे, जे अनुभवाच्या घट्ट कासेला लागलेले आहेत, आणखी आत्मनिवेदनरूप गलबत ज्यांचे हाती लागले आहे, तेवढे मात्र ही नदी हां हां म्हणतां तरून जातात. असो; तुम्हांस राज्य प्राप्त झाले म्हणजे तुम्ही इतकेंच पाहणे की, स्वधर्मत्याग करणाऱ्यास योग्य शासन करणे आणि धर्माप्रमाणे चालणाऱ्यांचे संरक्षण करणे. हे राजाचे मुख्य कर्तव्य आहे. (जिजाई भाकर व नारळ प्रसाद ह्मणून शिवाजीच्या ब सईबाईच्या पदरांत टाकते. उभयतां तुकारामाच्या पायां पडतात. पडदा पडतो.) प्रवेश ६ वा. स्थळ-देहू येथील नदीचा किनारा. (नित्यानंद व सदानंद प्रवेश करितात.) नित्यानंद-काय चमत्कार आहे हो ! साऱ्या साऱ्या जन्मांत आपल्याला असा चमत्कार दिसला नाही.