पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १२९ फिरत होते. त्याची आई लंगडी, आंधळी. कोळशासारखी काळी, अशी होती. हे मग आम्हांस पुढे समजले. ते लहान मूल बोबड्या बोबड्या शब्दाने माझी आई कोठे गेली म्हणून विचारीत होते. ते मूल ब्राम्हणाचे होते, म्हणून पुष्कळ ब्राम्हणांच्या बायका रंभेसारख्या सुंदर आणि अंगावर लाखों रुपयांचे दागिने घातलेल्या त्या मुलास घेऊन जाऊं लागल्या; पण तें मूल कांहीं केल्याने त्यांच्याकडे गेले नाही. शेवटी त्याची ती आंधळी आणखी पांगी आई बाळ्या बाळ्या करीत जेव्हां आली, तेव्हां ते तिच्याकडे झाप टाकून एकदम गेलें ! मग उभयतांना कितीपण आनंद झाला ह्मणून सांगू? सईबाई-पाहिले का याच्या बोलण्यांत किती खोल अर्थ उत्पन्न होत आहे तो! हा कांहीं याचे आईबाप गरीब जरी आहेत तरी आपल्या घरीं द्रव्याच्या आशेनें म्हणून कधीच येणार नाही. मुलगा कोणाचा ? तुकाराम-धर्माची तत्त्वं तरी अशीच आहेत. तुपाचा उपयोग जसा माशाला नाही, किंवा आपल्या आईला सोडून दुसऱ्या सुंदर स्त्रियांजवळ जसें तें बालक गेले नाही, तसें स्वधर्म सोडून परधर्माचे अवलंबन करणे व्यर्थ होय. पाणी जसे माशाला जीवित किंवा मुलाला जशी आई प्रिय, तसा तुम्ही आपल्या धर्मावर विश्वास ठेवा; परमेश्वराला स्मरा, मग तुम्हांला तिळमात्र कमी पडणार नाही. तुम्हांला शेवट उपदेशाचे दोन शब्द सांगतो त्यांच्याकडे लक्ष द्या. ही मायानदी महा दुस्तर आहे. हिच्या वारंवार येणाऱ्या लोंढ्यांनी सत्यलोकचे बुरुज कोसळतात. त्यांच्या धक्क्यांनी ब्रह्मलोकचे घोडे ढांसळून पडतात. ह्या पाण्याच्या वेगाला उनार म्हणून अजून झालेला नाही. हींतून तरून जाण्याकरितां जो जो ह्मणून उपाय करावा, तो तो अपायच होतो. कोणी आपल्या बुद्धिरूप भुजबळाच्या जोरावर आंत उडी ठोकली, त्यांचा मागमूससुद्धा उरला नाही. कोणी ज्ञानडोहांन शिरले होते, त्यांस गर्वानेच मिळून