पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ श्रीतुकाराम. शिवाजीसारखा मनुष्य तुमच्याजवळ राज्य मागायला आला, आणि तुह्मी त्याच्या पदरात भिकाऱ्यासारखी भाकर घालावयास मला सांगतां ! असेंच त्या चिंचवडच्या देवाला यांनी आपली मांडीच चिरून दाखविली.चिंचवडकर देव म्हणतात यांच्या मांडीत कापूस भरलेला आहे. तेही यांच्यासारखे खुळेच आहेत. वाघ, सिंह यांना मारून त्यांच्या पोटांत पेंढा भरून ठेवतांना आपण ऐकतों, पण माणूस मेल्यावर त्याच्या पोटांत कापूस भरून ठेवतांना कोठे पाहिले नाही. एकदां हे आळंदीला गेले, तेथे त्या मेल्या सोन्याच्या पिंपळाखाली कांहीं पांखरें-राघू चिमण्या-दाणे टिपीत बसली होती. प्रदक्षिणा घालून हे जसे जवळ आले तशी ती भरकन् उडून गेलीं! यांना वाटले की, पांखरे मला काय म्हणून भ्याली ? झाले. बसले खुंटून सकाळपासून तो संध्याकाळपावेतो. पुढे ती पांखरें जेव्हां यांच्या अंगावर येऊन बसू लागली तेव्हां हे जाग्यावरून हलले. लोहगांवच्या शिवजी कासाराच्या बायकोने तर यांच्या अंगावर अधणाचें कढत कढत पाणीच ओतलें, कां तर तिचा नवरा यांच्या भजनी लागला ! पुढे तिला रक्तपिती भरली, आणखी यांच्या अंघोळीने झालेला चिखल मलमाप्रमाणे तिला लावून ती बरी केली. देवीने मेलेलें मूल एका बाईने आणून यांच्या कीर्तनांत दिले टाकून. ते म्हणे काय यांच्या भजनाच्या तडाक्यांत जीवंत झाले, आणि उठनच बसले. यांचे वेडेपणाचे मासले तुह्मांला जर सांगू लागले तर एक भारत होईल. (जाते.) (महादेव प्रवेश करतो.) शिवाजी-महादेव, तूं येतोस का आमच्या घरी राहण्याला ? तुला काय पाहिजे ते देऊ. हत्ती देऊं, घोडा देऊ, मोठा वाडा देऊं तुला रहावयास.. महादेव-महाराज, मी एक वेळ रस्त्यावर मोठी मजा पाहिली. शिवाजी-कोणची रे ती ? महादेव-एक लहान मूल चुकलें होतें तें साऱ्या रस्त्याने रडत