पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १२७ महाराज धनद्रव्याला स्पर्शसुद्धां करीत नाहीत; नाही तर तुमच्या घरी गजांतलक्ष्मी करून सोडली असती. सईबाई-तुझी आमच्या घरीं चलानात आपल्या ? तुम्हांला मी आपल्या सासूबाईप्रमाणे समजेन. तुम्हांला काही कमी पडावयाचें नाही. मी तुमची रात्रंदिवस सेवाचाकरी करीन. जिजाई-एवढे मात्र बोलूं नका. हे जें खातील तेच मी खाईन. यांना भोजन घातल्याशिवाय मी अन्न खाले नाही. मला दोन दोन दिवस उपाससुद्धा काढावे लागले आहेत. याला साक्ष माझ्या माहेरची मंगळाई आहे. आतां हे वैकुंठाला जाईन म्हणतात, तर मला रात्रंदिवस काळजी लागली आहे. म्हटलं बरोबर चार दिवसांच्या दशम्या घेऊन जा, तर हंसायाला लागतात. सांगतात की तूं वेडी आहेस. मी क्षीरसागरी भगवान् शेषावर निजलेले आहेत तिकडे जाणार. आतां बाई काय करावं? तो शेष म्हणजे मेली विखारी सापाची जात. तें किरडू यांना चावलें बिवलें तर तिथं कांहीं भैरोबाचे देऊळसुद्धा नाही. यांना अगदीं वेड लागले. वेडाच्या भरांत यांनी दोन तीन गोष्टी अगदी जगांत हंसूं होईल अशा केल्या. चिंचवडच्या मोरयागोसाव्याला हे म्हणाले की मुंगीहून मी लहान आहे आणि आकाशाहून थोर आहे. यांच्या भारंभार जर तराजूत मुंग्या घातल्या तर कोट्यावधी भरतील. आभाळापेक्षां जर हे मोठे तर चांदोबाला का हात लावीत नाहीत ? बरं मी असें शहाणपणाने बोललें, तर मूर्खाप्रमाणे ते हंसूं लागतात. ते असो. पण तुझी मला येण्याविषयी आग्रह करूं नका. हे पहा, तुपाच्या अंगी जरी पाण्यापेक्षा अधिक गुण आहेत तरी त्यांत मासा राहू शकत नाही. तुकाराम-पुरे झाली तुझी बडबड. आपल्या घरी शिवाजी आले आहेत त्यांना आपल्या घरांतून खायला एक भाकरी आणून दे. आणखी या बाईच्या ओटीत एक नारळ घाल. जिजाई-आतां या बेअकलीपणाला करूं तरी काय ? एवढा