पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ श्रीतुकाराम. तुकाराम-शाबास बाई, तूं महा साध्वी आहेस. तुझे मनोरथ श्रीपांडुरंग पूर्ण करील. कोण आहे तिकडे ? जिजाई-(पडद्यांतून ) काय काम आहे ? तुकाराम-मटलं जरा बाहेर येऊन जा बरें. जिजाई-(प्रवेश करिते. शिवाजी व त्याची बायको पायां पडतात.) माझ्या पायां पडण्याचे काही कारण नाही. मी कांहीं पंढरीची वारी करीत नाही, आणखी माळाही पण माझ्या गळ्यांत नाहीत. या पंढरीच्या विठोबाने माझा नवरा वेडा केला आहे, आणखी आतांशा आम्ही वैकुंठाला जाणार ह्मणून सारखी बडबड करीत असतात. मला ह्मणतात तूं येतेस का बरोबर ? घरांत लैस व्यायला झाली त्याची कांहीं यांना काळजी आहे का ? अहो इतके कशाला ? प्रत्यक्ष यांचा मुलगा महादेव मुतखड्याने अत्यावस्थ होता, पण हे आपले स्वस्थ. मग जेव्हां पोराची तंगडी धरून पोरगं फरफर ओढीत विठोबाचे देवळांत नेले, आणि चांगला एका हातांत मोचा घेऊन त्याला मारण्याची जेव्हां भीति घातली तेव्हां त्या मुलाला लघ्वी होऊन ताबडतोब गुण आला. पण त्याचा कांहीं यांना आनंद तरी आहे का ? यांना तुम्ही मराठ्यांची गादी स्थापन व्हावी ह्मणून प्रसाद कसला मागतां ? आणखी ही तुमची वेडी बायको मुलबाळ कसली मागते ? हे जर तुझांला राज्य मिळवून देते तर यांची बायकामुलें अन्नान्न करून उपाशी कां मरती ? याचा तुम्हांला विचार नाही का ? या वेड्याच्या नादीं लामून तुह्मी सुद्धा बावचळला होता. रानांत निघून गेला होता. पण लवकरच आलांत शुद्धीवर. यांच्या नादी लागू नका. नाहीं तर यांच्यासारखे ताबडतोब व्हाल. शिवाजी-यांच्यासारखे आह्मी होऊं म्हणतां ? यांच्या नखाची आमच्याने बरोबरी होणार नाही. यांच्या तुह्मी धर्मपत्नी आहांत. तस्मात् तुह्मी भाग्यवान आहांत. मला माझ्या आईप्रमाणे आहांत.