पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२५ अंक ५ वा. - तुकाराम-तुम्हीं रामदासस्वामींची कृपा संपादन केलेली आहे. त्यांचे सन्निध वारंवार वास केला ह्मणजे तुमचे चित्तास संसार दुर्धर वाटणार नाही. तुमच्या जन्माचें सार्थक होईल. यापेक्षा अधिक इच्छा काय आहे ? शिवाजी-मी काय सांगावें? आपण सर्व जाणतच आहां. आपल्या महाराष्ट्रदेशांत मराठ्यांच्या गादीची स्थापना व्हावी ही माझी जन्मापासून इच्छा आहे. कुटुंबाचा मनोदय काय आहे, हेंही पण महाराज जाणतच आहेत. तथापि लौकीकार्थ अथवा त्यांच्याच तोंडांतन ऐकावयाचा असल्यास महाराजांनी त्यांनाच पुसावें. सईबाई-(एकीकडे ) हे काय बाई ? मला काय म्हणून वि. चारावें ? माझ्या गळ्यांत दिली आपली घोरपड अडकवून. आपल्या मनांत नाहींच जसे ? शिवाय मला बोलावयाची लाज नाहीं का वाटत ? ( उघड ) मला अगदी बोलावयाला लावायाचें नाहीं बर कां ? सगळे इकडेच बोलणे व्हावें. शिवाजी-त्यांच्याशी बोलावयाला काय हरकत आहे ? देवाशीं नाहीं का आपण मनांत बोलत ? आपल्या आईबापांबरोबर आपण किती लडिवाळपणे आणि प्रेमाने बोलतो ? तसेंच यांच्याशी बोलावयाचे. तुकाराम-मी कांहीं जोतिषी नाही, ह्मणून तुमचे ग्रह पाहन तुम्ही ह्मणतां त्या गोष्टी मी तुझांस सांगू शकेन. मी काही सामुद्रिक शास्त्र जाणत नाही. देवरुषी किंवा पंचाक्षरी नाही ह्मणन तुझांला भुताकेतांची, यक्षकिन्नरांची अथवा राक्षसांची बाधा आहे किंवा काय ते पाहूं शकेन. मला जन्मकुंडली समजत नाही. तें असो; पण कायहो सईबाई तुमची इच्छा काय आहे ? सईबाई-( लाजून ) जन्मोजन्मी याच पायाची दासी असावें, वंशपरंपरेनें या भरतभूमीची सेवा घडावी, आणखी आपल्यासारख्यांचा सहवास रात्रंदिवस असावा, ह्मणजे संसारयात्रा सुखदायक वाटेल.