पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ श्रीतुकाराम. तुकाराम-का बुवा झालें का तुमच्या मनाप्रमाणे ? आले शिवाजी पुनः संसारांत ? तानाजी-महाराजांनी कृपा केली ह्मणून सरकारचे पाय आमच्या पुनः दृष्टीला पडले. सर्व महाराजांच्या उपदेशाचा परिणाम आहे. सरकार आणि त्यांचे कुटुंब स्वामीचे दर्शनास यावयाकरितां निघालीं आहेत. तुकाराम-विनाकारण आमच्या दर्शनाचा सोहळा काय झणून करतात, कळत नाही. आमच्या दर्शनापासून त्यांना काय सुख वाटत असेल तें असो; श्रीरामदास त्यांचे गुरु आहेत, त्यांच्या दर्शनास नित्यशः जात जा ह्मणजे झाले, असें मी त्यांना आतां सांगतो. (शिवाजी व सईबाई प्रवेश करितात. पायां पडतात. तुकाराम उलट पायां पडतो.) का सईबाई, झालें का तुमच्या मनाप्रमाणे आतां ? आतां शिवाजी तुमच्या ताब्यांत सांपडला आहे, त्याला आतां सोडूं नका. शिवाजी-महाराजांच्या पुढे आलों ह्मणजे मी या संसाराच्या जाळ्यांत पुनः विनाकारण पडलों, ह्मणून माझ्या मनाला पश्चात्ताप वाटावयास लागतो. तुकाराम-संसारांत राहून परमेश्वराकडे लक्ष लावल्यास तो संसार सुखाचा होतो. जरी संसाराचे अंगीं पुष्कळ व्यसने आहेत तरी कीर्तनाच्या योगाने आपल्या ठिकाणी शुद्धता आणितां येते. आपल्या अंगी शुद्धता आल्यानंतर सर्व जग आपल्याला शुद्धच दिसूं लागते. कोठेच विषम भासत नाही. सर्व त्रिभुवन सोवळेंच आहे, असे भासू लागते. अशी स्थिति झाली ह्मणजे ईश्वराशी व आपल्याशी तादात्म्य होऊन जाते. शिवाजी-संसारांत राहून माझ्या मनांत अशी स्थिति उत्पन्न होण्याला मी काय करावे ? मला वाटते मला निरंतर आपला सहवास होईल, तर माझ्या मनाची स्थिति आपण सांगतां त्याप्रमाणे होण्यास फार अवधि लागणार नाही.