पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भलतियासवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकूट ॥ न विचारी कुडें कांहीं कपट। घात बळकट मांडियेला ॥२॥ न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्तही पाताळ आकाशा ॥ घाली उडी बळेंचि देखोनि फांसा। केलों या देशा पाहुणा ॥३॥ चेतवनि इंद्रिये सकळ । आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ दुराविली शुद्धबुद्धी केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हे ॥४॥ आतां काय ऐसे करावे यासी । बहु जाचलों केलों कासाविसी तुकयाबंधु म्हणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी जाली ॥५॥ अंक ५ वा. प्रवेश २ रा. अभंग कोरडे निघाले हे ऐकूनः थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला ॥ जनाचिया बोलासाठी चित्त क्षाभाविलें ॥ १॥ भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन ॥ झांकुनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ २ ॥ अवघे घालूनियां कोडें तानभुकेचे साकडें ॥ योगक्षेम पुढे तुज़ करणे लागेल ॥ ३ ॥ उदकी राखिले का कागद चुकविला जनवाद ॥ तुका म्हणे ब्रीद साच केलें आपुलें ॥४॥ कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन ॥ तुज होय सीण ते मी न करी सर्वथा ॥ १॥ चुकी झाली एक वेळा मजपासूनि चांडाळा ॥ उभे करोनिया जळा माजी वह्या राखील्या ॥२॥ नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार ॥ समर्थासी भार न कळे कैसा घालावा ।। ३॥ गेलें होऊनियां मागें नये बोलों तें वाउगें । पुढिलिया प्रसंग तुका म्हणे जाणावें ॥४॥ अंक ५ वा. प्रवेश ३ रा. श्री ज्ञानेश्वराची स्तुति करण्याचे पूर्वीःज्ञानियांचा गुरु राजा महाराव ।। म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हा १ मज पामरा हे काय थोरपण॥पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥ ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळगणे ॥ इतर तुळणे काय पुरे ॥३॥ तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली॥म्हणोनि ठेविली पायींदोई