पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सूचना. - तुकारामाचें काम करणारे पात्रानें खाली लिहिलेले अभंग खाली दर्शविलेल्या प्रसंगी मणण्याकरतां आहेत. अंक १ ला, प्रवेश ४ था. आत्मगत भाषणाचे पूर्वीः गोविंद गोविंद ॥ मना लागलिया छंद ॥१॥ मग गोविंद ते काया ॥ भेद नाहीं देवा तया ॥२॥ आनंदलें मन ॥ में पाझरती लोचन ॥३॥ तुका ह्मणे आळी ॥ जेवी नुरेची वेगळी ॥४॥ अंक २ रा, प्रवेश ३ रा. शिवाजीस माळ घालते वेळी:-- आझी तेणें सुखी ॥ म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ॥१॥ तुमचें येर वित्त धन ॥ तें मज मृत्तिकेसमान ॥२॥ कंठी मिरवा तुळसी ॥ व्रत करा एकादशी ॥ ३ ॥ म्हणवा हरिचे दास ॥ तुका म्हणे मज हे आस ॥४॥ संताचा महिमा वर्णन केल्यावरःसेवीन उच्छिष्ट लोन अंगणीं ॥वैष्णवाचरणी होईन जोडा १ ऐसे जन्म आतां मज देई देवा ॥ आवडी हे जीवा सर्व काळ २ त्यांचे चरणरज येती अंगावरी॥वंदित ते शिरीजाईन मागे ३ तुका म्हणे येथे राहिलासे भाव ॥ सकळही वाव जाणोनियां ४ अंक ३ रा, प्रवेश २ रा. मंबाजीने मारल्यावरःन सोडी न सोडी न सोडीं॥ विठोबा चरण न सोडीं ॥१॥ भलते जड पडो भारी ॥ जीवावरी आगोज ॥२॥ शतखंड देह शस्त्रधारी ॥ करितां परी न भीयें ॥३॥ तुका म्हणे केली आधीं ॥ दृढ बुद्धी सावध ॥ ४ ॥ अंक ४ था, प्रवेश ४ था. मनास उद्देशून आत्मगत भाषणाचे पूर्वीः काय काय करितों या मना । परी नायके नारायणा ॥ करूं नये त्याची करी विवंचना। पतना नेऊ आदरीलें ॥१॥