पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२३ अंक ५ वा. ह्मणजे गण्याला आगरखी गोप्याला दिला. महाराजांनी मग सनदांचे काय केलें ! पंडितराव-सरकाराला मोठेच कोडे पडलें. आईसाहेबांची सल्ला घेतली, सर्व वृद्ध मंडळीची सल्ला घेतली, परंतु कोणालाच तोड निघेना. जो तो तुकाराममहाराजांची निस्पृहता वर्णन करूं लागला. नंतर सरकारांनी आपले गुरु श्रीरामदासस्वामी यांना जाऊन विचारिले. त्यांनी तुकाराममहाराज, हे केवळ अवतारी आहेत, महावैष्णव आहेत, ज्या ज्या वेळी भगवंतांनी अवतार घेऊन धर्माची संस्थापना केली त्या त्या वेळी त्यांचेबरोबर तुकारामांनी अवतार घेतलेला आहे, ते निरिच्छ असणारच, असे सांगितले. तानाजी-भगवंताच्या प्रत्येक अवतारी तुकाराम आहेतच, मणजे मी नाही समजलों.. पंडितराव-आपल्या सरकारांनी सुद्धां श्रीरामदासस्वामीस असाच प्रश्न केला. त्यावर ते ह्मणाले की, नरसिंह-अवतारी प्रन्हाद तुकारामच होता. रामावतारी भरत होता. कृष्णावतारी उद्धव होता. नंतर नामदेव, श्रीपांडुरंगाचा केवळ प्राण झाला, आणि आतां तोच हा तुकाराम. रामदास ह्मणाले देव आणि भक्त हे निरनिराळे होत नाहीत. जशी सूर्य आणि त्याची प्रभा एकत्र असते, तसेच ते आहेत. आपले रामदास सुद्धा मारुतीचा अवतार आहेत. तानाजी-पण पुढे सनदांचे काय झाले? पंडितराव-रामदासांनी त्या सनदा चिंचवडच्या देवाला देण्याविषयी आज्ञा केली. याप्रमाणे मौज झाली. आतां तुकारामाच्या मुलाला काही तरी जहागीर करून यावी असा आपल्या सरकारचा विचार आहे. पण तो केव्हां, तुकारामानंतर. तें असो. हे पहा तुकारामबुवा आले. (तुकाराम प्रवेश करितो. उभयतां त्याचे पायां पडतात.)