पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ श्रीतुकाराम. आपल्या घरी राहण्याला येईल. मुले सुद्धा तशीच. ती आपलं स्वतःचे घर सोडून आपल्या घरी येणार नाहीत. सईबाई-पण तुकोबाच्या बायकोचा समज तर असा आहे की, मला माझ्या माहेरच्या बहिरोबा देवाने आणखी मंगळाई देवीने पितांबर दिला; म्हणून म्हणतं की, ती आपल्या घरी खात्रीनं येईल. शिवाजी-बरें तर हातच्या कांकणाला आरसा कशाला ? चला प्रयत्न करून पाहूं. (जातात.) प्रवेश ५ वा. स्थळ-तुकारामाची पुण्यात राहण्याची जागा. ( तानाजीराव व पंडितराव प्रवेश करितात.) तानाजी-सरकारांनी श्रीतुकाराममहाराजांस दोन लक्षांचे गांव जहागीर करून दिले त्याच्या सनदा आपल्याकडून रवाना झाल्या किंवा नाही ? पंडितराव-तुमाला काहीच बातमी नाही तर ? बरोबर आहे, तुम्हीं मध्यंतरी परगांवीं गेला होता हे माझे लक्षात नाही. तुकाराम जवाहिराला शिवले नाहीत, हे तर तुह्मांस माहीत आहेच. पुढे महाराजांनी विरक्तपणाचा बाह्य दृष्टीने त्याग करून घरीं आल्यावर त्यांच्या नांवें दोन लाखांच्या सनदा करून मजबरोबर पाठविल्या. त्या पाहून तुकारामानें जवाहिराप्रमाणेच त्यांचा निषेध केला, व सनदा परत पाठविल्या. तानाजी-पण कायहो, पंडितराव, सरकारचा तर असा नियम आहे की, धर्म केलेली वस्तु ह्मणून पुनः परत घ्यावयाचा नाही. जवाहीर तुकारामाने घेतले नाही ते त्यांनी ब्राह्मणांस वाटून दिले. आणखी त्यांतला काही भाग त्या गरीबाच्या मुलांना