पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १२१ रीतीने बरोबर देऊन, देऊ परत पाठवून. मला वाटते आपण बोलावण्याचा उशीर आहे की, त्यांची बायको आपल्या घरी येण्याचे तेव्हांच कबूल करील. मुलेंही पण मोठ्या आनंदानें आपल्या समागमें येतील. शिवाजी-तूं अजून जिजाईला आणखी तिच्या मुलांना ओळखलें नाहींस. पतीच्या ठिकाणी तिचें अत्यंत लक्ष असून ती माउली मोठी सत्वशील आहे. निष्कपट आहे. रावणाप्रमाणे ती पांडुरंगाची विरोधभक्ति करते. आपल्या कानीं गुणगुण आलेली तुला स्मरते का ? ती एक दिवस नहात असतां एकाएकी व्याह्याकडील मोठी दणक्याची अक्षत आली. लौकर लौकर नेसण्यास वस्त्र पाहूं लागली तो तुकोबानी अगोदरच तिचे वस्त्र एका अनाथ ब्राह्मणस्त्रीला धर्मार्थ देऊन आपण गेले होते निघून भामनाथडोंगरावर ! अक्षतीचे लोक घरांत भराभर शिरले. अशा संकटांत पडतांच पांडुरंगाने आपल्या अंगावरचा पितांबर तिला वरून फेंकून दिला ! केवढी तिची योग्यता ! द्रौपदीला देवाने असाच आपल्या अंगावरचा पितांबर नेसविला होता. दुसऱ्या अनेक गोष्टी आपल्या कानावर आल्या आहेत. सईबाई-ऐकलें होतें खरेंच की, तुकोबाचे वडलाचें श्राद्ध होतें. श्राद्धाची वेळ तर टळून गेली.तुकोबा गेले होते गहूं आणण्याकरितां. बायको वाट पाहून पाहून कंटाळली. शेवटी तुकोबाजों घरी येऊन पाहतात तो हजारों पात्र जेवून गेलेले आहे. मग शोधांती समजलें की, पांडुरंग तुकोबाच्या स्वरूपाने येऊन सर्व प्रकारचे साहित्य बरोबर आणून सर्व देहूगांवाला भोजन घालून भांडी परत करण्याच्या निमित्ताने जे घराबाहेर पडले ते पुनः परत आले नाहीत. मग खरे तुकोबा विठोबाच्या देवळांत जाऊन शोक करूं लागले. तेव्हां देव प्रसन्न होऊन त्याच्याबरोबर घरी येऊन जेवले. शिवाजी-अहाहा ! केवढा अधिकार तुकारामबोवांचा ! मला नाही वाटत की, आपल्या नवऱ्याला सोडून एक दिवस तरी ती