पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૨૨૦ श्रीतुकाराम. शिवाजी-हं हं ! आतां आलें माझ्या ध्यानांत. आपल्यास चिरंजीव पाहिजेत हेच किनई ? • सईबाई-इकडे नकोच असेल अगदी. मलाच तेवढी गरज आहे वाटते? शिवाजी-आपल्याला नाहीं गरज. असेल देवाच्या मनांत तर होईल. मला फक्त मराठ्यांच्या गादीची स्थापना व्हावी एवढीच इच्छा आहे. आतां तुझ्याकरतां दुसरा संकल्प तूंच मनांत धरून स्वामीस नमस्कार कर. जर तुला त्यांनी श्रीफल प्रसाद ह्मणून दिले, तर तुला पुत्ररत्न खास होणार असें पक्कें समज. तानाजीराव आणि पंडितराव यांच्या हाती स्वामीस मी निरोप पाठविला आहे की, हा दास चरणाचे दर्शन घेण्याकरितां येत आहे. शिवाय आईसाहेबांची मला अशी आज्ञा आहे की, जोपावेतों महाराजांची स्वारी येथे आहे तोपावेतों नित्यशः दर्शनाला जात जावें. सईबाई-मला सुद्धा त्यांचें असेंच सांगणे आहे. मटलें रंगूला आणि गंमूला बरोबर घ्यावयाचें का ? शिवाजी-नको. आपला हा गुप्त बेत कोणासच कळवावयाचा नाही. नाही तर स्वामींनी आपल्यास भाकरच प्रसाद दिला ह्मणून जिकडे तिकडे बातमी पसरेल. घरी आल्यावर फक्त मातुश्रीस मात्र झालेली हकीकत कळवायची. सईबाई-जर स्वामींनी आपल्यास भाकर आणखी नारळ दोन्ही जर प्रसाद ह्मणून दिले, तर सासूबाईंना किती पण धन्य धन्य वाटेल? शिवाजी-तें सारें खरें, पण तुकाराममहाराज आपल्याजवळून काहीच घेत नाहीत, याला तोड काय करावी ? सईबाई-याला एक युक्ति आहे. स्वामी तर कांहीं धनद्रव्याला शिवत नाहीत. तेव्हां मला असे वाटते की, त्यांचे कुटुंबास आणखी मुलाबाळांस चार दिवस आपण आपल्या घरी आणून ठेवू. त्यांना चांगले मौल्यवान् दागिने, उंची उंची कपडे, असे गुप्त