पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मजवर तर काय परंतु या महाराष्ट्र देशावर अनंत उपकार झाले. आज तुकाराम आहेत म्हणून मराठ्यांच्या गादीची स्थापना होण्याचा संभव तरी आहे-असो; आतां माझ्याबरोबर तुकाराममहाराजांचे दर्शनाला चलायचे का? आज त्यांची स्वारी येथे आपल्या गांवांत आली आहे ह्मणून म्हणतो. असा संकल्प मनांत करून जायचे की, जर आपल्यास राज्यप्राप्ति होणार असेल तर श्री तुकाराममहाराज आपल्यास प्रसाद ह्मणून आपल्या पदरांत भाकर घालतील. तीच आपण शकून गांठ बांधू. सईबाई-(एकीकडे ) पहिल्या स्वभावांत आणि आतांच्या स्वभावांत जमीन-अस्मानचे अंतर. आतां खरा राग कसा तो येतच नाही. आलाच कदाचित् थोडासा तर आपले आपणच हंसं लागायचे. विस्तव हातांत धरवेल, पण मर्जी संभाळण्याचे कठीण होते. अगदी सर्व गोष्टी मर्जीवरहुकूम झाल्याच पाहिजेत. आता स्वभावांत इतकी कांहीं शांतता उत्पन्न झाली आहे की एखायाला वाटेल हे स्वयंभू देवच आहेत. अत्यंत सुखाच्या गोष्टी इकडे निरस वाटतात. पण आश्चर्याची गोष्ट ही की, चंदनाच्या शेजारी जरी कडुनिंबाची झाडे असली, तरी तीही सुवासिक होतात, त्याप्रमाणे इकडच्या संगतीने घरांतील चाकरमाणसांच्या वृत्ति सुद्धां पालटूं लागल्या आहेत. ( उघड ) तेवढें राज्य मिळालें ह्मणजे काम झाले वाटते? मला काय त्यांत आहे ? मी आपली कोरडीच. शिवाजी-मराठ्यांच्या गादीची स्थापना झाली, आणि मी आपल्याला छत्रपति ह्मणवू लागलों तर यांत तुला कांहींच का मिळाले नाहीं ! तुला महाराणीसाहेब असें नाहीं का या जगांत म्हणणार? सईबाई-मला नको इतका मोठेपणा. मला इकडची तेवढी सेवा असली म्हणजे झाले. पण आपल्यामागे मराठ्यांचे राज्य चालणार कसे, याची कांहींच काळजी नको का ?