पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ श्रीतुकाराम. अंतपार लागला नाही, ब्रम्हादिकांच्या लक्षात येत नाहीस, तेथें आमची कथा काय ? अव्यक्त, अलक्ष्य, अपार, अनंत आणि निर्गुण असा तूं आहेस. ज्याचा जसा भाव असेल तसा तूं त्याला पावतोस अशी माझी आतां खात्री झाली. माझ्या पहिल्या वृत्तींत आणि सांप्रतच्या वृत्तींत किती तरी तफावत पडला ? कोवळ्या उसाचा रस जर आपण प्यालों तर त्यांत गोडी कांहीं लागणार नाही, तसें ज्या मनुष्याला परमेश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान झाले नाही त्याचे भाषण फिके लागते. माझ्या आयुष्यक्रमांतील अत्यंत सुखाचा दिवस म्हटला म्हणजे स्वामी रामदास आणि तुकाराम यांचे दर्शन ज्या दिवशी झालें तो होय. सारांश, कामक्रोधादि पड्रियु आणि अहंतातृषादि षडूमि यांचा मजवर ताबा होता, मी त्यांचा बंदा गुलाम होतो, परंतु आतां मीच त्यांना आपल्या ताव्यांत ठेविले आहे. माझ्या वीरवृत्तीला आणि क्षात्रधर्माला त्यांची गरज आहे म्हणून मर्यादितपणे मी त्यांचा उपयोग करीन, आणि ज्या कुळांत आणि ज्या देशांत माझी उत्पत्ति झाली आहे त्या कुलाचे आणि त्या देशाचें नांव अजरामर करीन.. म. (सईबाई प्रवेश करते, शिवाजी उघड बोलतो.) श्री तुकाराममहाराजांनी माझें मन पुनः या संसारांत गोवून टाकिलें. मातुश्रीकरितां आणि स्वामीची आज्ञा मान्य केलीच पाहिजे म्हणून मी पुनः घरी आलो. शिवाय मराठ्यांचे गादीची स्थापना करणे हा जो माझा हेतु तोही पण संन्यास वृत्ति घेऊन सिद्धीस गेला नसता. मराठ्यांचे गादीची स्थापना करण्याचा संकल्प जरी सिद्धीस गेला, तरी तें सर्व श्रेय तुकाराममहाराजांकडेसच आहे, माझ्याकडे काही नाही. कारण त्यांच्याच उपदेशाने मी पुनः संसार पाहूं लागणार. आमच्या मातुश्रीवर त्यांनी मोठाच अनुग्रह केला म्हणावयाचा. कारण मी जर पुनः घरी आलों नसतो, तर मातुश्री कांहीं फार दिवस वांचली नसती. तुमचीही पण हीच गति झाली असती. सर्व प्रकारें स्वामीचे