पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. ११७ तुकाराम-ज्याप्रमाणे गंगेची पूजा करावयाची झणजे गंगेचंच उदक घ्यावे लागते, त्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरमहाराजांची स्तुति करावयाची म्हणजे त्यांच्याच वाणीचा आधार धरून केली पाहिजे. स्तुति करण्यापुरता सुद्धा माझा अधिकार नाही. ज्यांच्या चरणांचे रजःकण कपाळी लागले तर वासनेचे बीज जळून जातें, रामनामाची आवड उत्पन्न होते, घटकोघट की सुख वाढू लागते, प्रेमाने कंठ दाटून येतो, नेत्रावाटें आनंदाश्रूचा लोट चालतो, हर्षानें ब्रम्हांड उकलते की काय असा भास होतो, आणखी मीपणा समूळ नष्ट होतो. मुक्तांत अग्रगण्य, ब्रह्मचर्यांचा शिरोमाणि, योग्यांनी ज्याला आपल्या मुकुटाच्या स्थानीं जागा यावी, आणखी भक्तमंडळींत परम श्रेष्ठ, असे जे परब्रह्म ज्ञानेश्वर, त्यांना माझा नमस्कार असो. ज्या गीतार्थाची थोरवी प्रत्यक्ष शंकराने वर्णन केली आहे, जिच्यापुढे वेद स्तब्ध राहतात, त्या भगवद्गीतेवर टीका करून आम्हां भाविक जनांना सोपी केली, प्रतिष्ठानच्या विप्रांच्या गर्वाचे खंडन करून रेड्याच्या तोंडांतून ज्याने वेद बोलविले, आणि ज्याने निर्जीव भिंत चालविली, ते प्रत्यक्ष पांडुरंगच असून या कलियुगांत गोब्राम्हण त्रस्त झाल्याने प्रत्यक्ष त्यांनीच अवतार धारण केलेला आहे. तस्मात् त्यांना हा तुकाराम अनन्यभावें शरणागत होऊन अशी प्रतिज्ञा करतो की, त्यांचेच चरणाचे प्रसादाने फक्त नामस्मरणाच्या योगाने ही काया ब्रम्हरूप करीन आणि सदेह वैकुंठाला जाईन - (जातो.) प्रवेश ४ था. स्थळ-शिवाजीमहाराजांचा वाडा. (शिवाजी प्रवेश करतो.) शिवाजी-(एकीकडे) हे परमेश्वरा, तुझी स्तुति करण्यास कोण समर्थ आहे ? सहस्रमुखी शेष, पण तोही बापडा भागला. वेदाला तुझा