पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ श्रीतुकाराम. हरगिज् उस्कू सताना नहि. दुसरे लोगोके औरतांकू आपनी मादर समजना और दुसरेके दौलतकू लाथ मारना. झूटि बात् नहि करना. अम्मल नहीं करना. खुदाहुताला जिस्कू हम् राम कहते और तुम रहिम् कहते उस्की हम्मेश याद करना. - अनगडशा-बहुत बेहेतर. हमारे कुरानेशरीफमे यहि कलम किया हय. आजसे मै तुमारा दोस्त या चेला बनता हूं. मेरे उपर एहसान करना, रामेश्वरभटजीकू मैने ताराज किया उस्की मुजे माफ हो. रामेश्वर-आजसे तुमारी हमारी दिलजमाई होचुकी. तुकाराममहाराज आपने दोनोके उस्तादेशरीफ हय्. आब् हातसे हात मिलाव. मीठी मीठी बाते करेंगे. (तुकाराम दोघांचे हात धरून हातात हात घालितो ). तुकाराम-हिंदुमुसलमान या देशमातेची लेकरें आहेत. ज्या परमेश्वराने हिंदूला उत्पन्न केले, त्यानेच मुसलमानाला उत्पन्न केले. एकाच आईबापाची लेकरें. सूर्याला निरनिराळ्या भाषेत निरनिराळ्या देशांत निरनिराळी नांवे आहेत, ह्मणून सूर्य कांहीं निराळा आहे काय ? तसाच परमेश्वर एकच आहे. मुसलमान निराळ्या नांवाने हाक मारतात, आह्मी निराळ्या नावाने हाक मारतो. ईश्वराने अनेक पशु पक्षी उत्पन्न केले आहेत. त्याने चवदा भुवनें केली आहेत. गगन, चंद्र, सूर्य, तारे उत्पन्न केले आहेत. पंचमहाभूतें उत्पन्न केली आहेत, तो नाटकी प्रभु आहे, त्याची लीला अगाध आहे. हा त्याचा खेळ आहे.त्यांत कोणी कोणाला ठार मारण्यास अधिकारी होत नाही. स्थूल, सूक्ष्म जीवजीवांचे अंतरीं परमेश्वर आहे, ह्मणून आपण सर्व जीवावर सारखी ममता करावी. मुंगीपासून तो हत्तीपावेतों सर्व जीव ममतेने वागवावे. आपले चित्त शुद्ध असल्यावर व्याघ्र आपणास खाणार नाहीत. सर्प दंश करणार नाहीत. विषाचे अमृत होईल. ( रामेश्वरभट व अनगडशा जातात. तुकाराम ज्ञानेश्वरमहाराजांची प्रार्थना करितो )