पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. ग्रंथ तयार करण्याचे कामी मदत केली, व ज्यांनी वेळोवेळी आपली पोक्त मसलत देऊन महाराष्ट्रभाषेची अल्प सेवा आमचे हातून करून घेतली, त्यांचा मी फार ऋणी असून त्यांची नांवे मोठ्या आनंदाने सुज्ञ वाचकांपुढे मांडतो.. रा. ब. माधवराव केशव कुमठेकर, सेक्रेटरी म्युनिसिपालिटी पुणे. रा. सा. विनायक सखाराम देशमुख, हेड मास्तर ठाणा हायस्कूल. रा. सा. रामचंद्र निळकंठ इनामदार, ऑनररी माजिखेट पुणे. रा. रा. गोपाळ रंगनाथ शिरवळकर, नाझर फ. सबजज्य कोट धुळे. बळवंतराव लक्ष्मण ठकार, हेड मास्तर मिड्ल स्कूल जालना. प्रो० सदाशिव रुष्ण पिंपळखरे, पुणे. रा. रा. विनायक त्रिंबक मोडक, पुणे. ,, शंकर आत्माराम पाटकर, पुणे. , रामचंद्र बाळकृष्ण कोनकर, पुणे. ,,, रामचंद्र नारायण जोशी, पुणे. ज्या ग्रंथांच्या आधाराने हा ग्रंथ रचिला त्यांची नांवें: १. नामदार मुंबईसरकारच्या आश्रयाने कै. विष्णु परशरामशास्त्री पंडित व शंकर पांडुरंग पंडित, एम. ए. यांनी छापून प्रसिद्ध केलेली तुकारामबावाच्या अभंगांची गाथा. २तकारामतात्या यांनी तत्त्वविवेचक ग्रंथप्रसारक मंडळीसाठी छापून प्रसिद्ध केलेली गाथा. 3.माडगांवकर यांनी छापून प्रसिद्ध केलेली तुकारामाची गाथा. ४. बाळकृष्ण मल्हार हंस, वकील, इंदूर, यांनी तुकाराम याच्या धमसंबंधी व नीतिसंबंधी उपदेशपर लिहिलेला निबंध. ५. चिपळूणकररुत निबंधमाला. ६. कुंटे यांनी प्रसिद्ध केलेली ज्ञानेश्वरी. केरळकोकिळचे लेखकाने प्रसिद्ध केलेली सार्थ व सटीक ज्ञानेश्वरी. ८. राजवाडेरुत मराठ्यांच्या इतिहासाची साधनें. ९. ग्रांट डफलत मराठ्यांची बखर. १०. महिपतिरुत तुकारामाचें चरित्र. वरील पुस्तककर्त्यांचा ग्रंथकार फार आभारी आहे.