पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. ११३ पांडुरंगाने तुला त्या फकीराकरवी अशी शिक्षा केली आहे. आतां तूं तुकाराममहाराजांना शरण जा, ह्मणजे तुझी व्याधि ताबडतोब नष्ट होईल. (एक शिष्य प्रवेश करितो.) शिष्य-महाराज, आपला निरोप मी तुकाराममहाराजांस कळविला. आपल्या शरीरास व्याधि उत्पन्न झाली आहे, अशी तुकारामास बातमी कळतांच त्यांना फार वाईट वाटले. ते आपल्या समाचारास इकडे येण्यास निघाले आहेत. हा अभंग त्यांनी आपल्यास लिहून दिला आहे. तो आपण पाठ करावा ह्मणजे आपला दाह कमी होईल असे त्यांनी सांगितले आहे. ( अभंगाचा कागद हातांत देतो व जातो.) रामेश्वर-(कागद मस्तकाला लावून नमस्कार करितो.) काय बरें महाराजांनी या कागदांत लिहिले आहे ? महाराजांचे ग्रंथ इंद्रायणीचे डोहांत तेरा दिवस कोरडे राहिले, हे पाहून महाराजांविषयी मी पूर्वी धरलेली माझी दुष्ट बुद्धि नष्ट झाली. (पत्र वाचतो.) चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥ १॥ विष ते अमृत अघात ते हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥२॥ दुःख ते देईल सर्व सुखफळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥ ३॥ आवडेल जीवां जिवाचिये परी । सकळां अंतरी एक भाव ॥४॥ तुका ह्मणे कृपा केली नारायणे । जाणिजे ते येणे अनुभवें ॥५॥ अहाहा ! काय ही वाक्ये आहेत बरें! एक एक अक्षर बिनमोल आहे. शुद्ध चित्त असल्यावर काय होणार नाहीं बरें! हा अभंग वाचल्याबरोबर माझ्या अंगाची आग कमी व्हावयास लागली. आत मी याची पारायणे करितों ह्मणजे माझी प्रकृति अगदी साफ होऊन जाईल. अशा सत्पुरुषाच्या