पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ धीतुकाराम. तर तुझांस अत्यंत वाईट बाटणार आहे. त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तुमाला माझा राग येईल. नित्यानंद-काय, ज्ञानेश्वरमहाराजांचे वाक्यावर आमचा विश्वास नाही ? असें ह्मणूं नका. सदानंद-जे आहेत ते मी सांगू का काय दृष्टांत झाला आहे तो? त्या फकीराला शरण जावें झणजे यांची व्याधि दूर होईल. नित्यानंद-मग यांत आम्हांस वाईट का म्हणून वाटावें ? परंतु त्या तुकारामास शरण जा असा जर दृष्टांत झाला असेल तर तुमची आमची ही शेवटचीच भेट. रामेश्वर-त्या यवनाला शरण जाण्यास तुमची हरकत नाही, पण तुकारामास नको म्हणतां ? काय तुमची दुष्ट बुद्धि ! जा मला तुमची संगति पुरे झाली आतां ! नित्यानंद-फकीराने तुमच्या अंगाचा एका पळांत भडका केला हेच त्याच्या साधुत्वाचे दर्शक आहे; म्हणून आम्ही ह्मणतो त्यालाच शरण जावें, म्हणजे आपली व्याधि दूर होईल. आतां तुह्माला आमची संगति पुरे झाली ह्मणतां तर तुमचीही पण संगति आमांस पुरे झाली. तुमची आमची हीच भेट. दादोजी कोंडदेव सर न्यायाधीश यांच्याकडे जाऊन त्या तुक्याला पकडून आणवितो. तुझी त्याला तिकडे शरण जा नाही तर इकडेच राम ह्मणा. (दोघे जातात.) रामेश्वर-(आत्मगत ) खरोखर मी आतां व्याधीने पडलों आहे, नाही तर या बोक्या संन्याशांची खोड बरीच जिरविली असती. त्यांच्या नादाने आणखी त्या मंबाजीच्या नादाने त्या महा साधचे प्रासादिक ग्रंथ मी पाण्यात बुडविले. परंतु भगवंताने ते तेरा दिवस उदकांत कोरडे राखले. अहाहा! त्या महा साधूची ही केवढी थोरवी ! हे नीच संन्यासी मला म्हणतात त्या फकीरास शरण जा. श्री ज्ञानेश्वरमहाराजांचा मला असा दृष्टांत झाला आहे की, तूं त्या महात्म्याचा व्यर्थ छळ केलास, ह्मणून श्री