पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ श्रीतुकाराम. पायाचे दर्शन घेण्यास आपण सत्वर जावें हेच उचित आहे. (जाऊं लागतो, तो त्यास तुकाराम भेटतो. उभयतां एकमेकांच्या पायां पडतात.) महाराज, मी आपला अत्यंत अपराधी आहे. मी आपला विनाकारण छळ केला. त्याचें प्रायश्चित्त मला परमेश्वराने योग्य दिले. आपण श्रीविठ्ठलभक्त, जीवनमुक्त, नेहमी ब्रह्मानंदांत मग्न, कामक्रोधाला तिळांजळी अर्पण केलेले, मूर्तिमंत क्षमा अंगांत बाणलेले, देव, द्विज यांचे पूजन करणारे, आणि संतग्रहमंडळांत केवळ सूर्याप्रमाणे प्रकाशमान, असे जे तुह्मी त्या तुह्माला मी अनन्यभावें शरण आहे. हेतु इतकाच की, या पायांची रात्रंदिवस सेवा घडावी. तुकाराम-छे छे. आपण असे भाषणसुद्धा करू नका. आपण ब्राह्मण, मी यःकश्चित् शुद्र. आपल्या चरणाची सेवा रात्रंदिवस करण्यास मीच तयार असले पाहिजे. आपल्या शरीरास आग़म झालेला पाहून मला फार आनंद झाला आहे. श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी आपल्या संकटाचे निरसन केले. आपल्याला ज्याने एका शब्दानें व्याधि उत्पन्न केली, तो कोणी तरी सिद्ध पुरुष असला पाहिजे. त्याचे दर्शन आपणास पुनः झाले, तर फार उत्तम होईल. पण हे कोण बरें आपणाकडे येत आहे ? (अनगडशा प्रवेश करितो.) अनगडशा-(आत्मगत) नीहायत बडे ताजूबकी बात हय् के रामेश्वर भटजीके तनकी गर्मी तुकारामनें एक लव्हजमे नेस्त नाबूद किया. इस्में हासल मतलबकी बात ये हय के, तुकाराम बडा साई हय. मेरे दिलकी खायश अब ये हय के मय उस्कू आखोंसे देखें और उस्की मेहेरनजर पैदा करूं. ये दो शक्स कौन हय भला ? पहिला तो मैने पूरा पैछाना. यहि रामेश्वरभट हय. लेकिन उस्के सात दुसरे दो संन्यासी थे, ओ कहां निकल गये ?