पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. शिवाजी-महाराजांचे आज्ञेची अवज्ञा करणे हे महत्पाप आहे असें मी समजतो. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्री रामदासस्वामीचे चरणी लक्ष ठेवून ही संसारयात्रा सुखाची करण्याचा प्रयत्न करितों. (तुकाराम वस्खें, भूषणे शिवाजीचे आंगावर घालतो.) जिजाबाई-महाराजांनी मला आज पुत्ररत्न दिले याबद्दल मी महाराजांचे काय उतराई व्हावें बरें ? तुकाराम-श्री पांडुरंगाची भक्ति करा, ह्मणजे आम्हास सर्व पोहोंचलें. तुम्ही आपापले घरीं आतां जा. तुम्ही फार थकला आहांत. ( सर्व नमस्कार करून जातात व तुकारामही एका बाजूने जातो.) प्रवेश ३ रा. स्थळ-आळंदी येथील ज्ञानेश्वरमहाराजांचे देवालय. (रामेश्वरभट अंगाची आग होते ह्मणून तळमळतो आहे. जवळ नित्यानंद, सदानंद बसले आहेत, व इतर शिष्य मंडळी बसली आहेत, असा पडदा उघडतो) रामेश्वर-यतिमहाराज, आतां माझी वाचण्याची आशा नको. माझ्या सर्वांगाचा डोंब झालेला कायम आहे. माझ्याने आतां जास्त बोलवत नाही.. नित्यानंद-महाराजांनी फारसें बोलूं नये. आमांस इतकेंच सांगावें की, आज आठ दिवस आपण जे ज्ञानेश्वरमहाराजांचे घरी धरणे धरून बसलो आहोत त्याचा काही उपयोग झाला किंवा आपले सारे श्रम फुकट गेले ? सदानंद-जे आहेत ते आपणांस कांहीं साक्षात्कार किंवा दृष्टांत वगैरे काही झाला किंवा नाही ? मणजे त्याप्रमाणे वागण्यास बरें पडेल, याला जे आहेत ते औषध नाहीं कांहीं नाहीं. रामेश्वर-मला जो दृष्टांत झाला आहे तो जर तुह्मी ऐकला