पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० श्रीतुकाराम. नाही. आतां तुकाराममहाराजांनी जर रूपा केली तर माझे पाय भुईला लागतील. माझा सर्वस्वी घात झाला आहे. (तुकाराम प्रवेश करतो.) तुकाराम-शिवाजी, भगवंतांनी गीतेमध्ये अर्जुनास क्षत्रियांचे अंगी काय काय गुण असले पाहिजेत, हे सांगतांना काय सांगितलें आहे बरें ? त्याच्या अंगी सिंहासारखा पराक्रम, सूर्यासारखें तेज, अंगावर आकाश कोसळून पडले तरी धैर्य न सोडणे, कमलपुष्प ज्याप्रमाणे अथाक पाणी फोडून वर उमलतें त्याप्रमाणे असंख्य संकटें प्राप्त झाली तरी क्षत्रिय वीरांनी आपलें दक्षत्व न सोडणे, सूर्यकमळाची पुष्पं जशी सूर्याकडेच नेहमी तोंडे करितात, पाठ कधी दाखवीत नाहीत, त्याप्रमाणे शत्रूस पाठ न दाखवितां युद्धचापल्य दाखविणे, आम्रवृक्षाप्रमाणे ओदार्य आणि ईश्वराचे ठिकाणी निस्सीम भाक्ति, हा सातवा गुण त्यांचे अंगी असला म्हणजे आकाश जसे सप्तऋषींनी शोभिवंत दिसतें, त्याप्रमाणे ते क्षत्रिय दिसतात. तात्पर्य शौर्य, तेज, धैर्य, दक्षता, युद्धचापल्य, दानशौंडत्व आणि ईश्वरभक्ति हे तुमचे स्वाभाविक गुण असले पाहिजेत. तुम्ही जर सर्वसंगपरित्याग करून तपश्चर्या केली आणि वैराग्य धारण केले, तर स्वधर्मत्यागाचे मोठे पातक तुह्माला लागेल. शांति, क्षमा, तपश्चर्या, एकांतवास, संसारत्याग, अत्यंत नम्रता आणि वैराग्य इत्यादि ब्रह्मक, चांगली खरी. पण ती कोणास ? ब्राह्मणास मात्र. तुह्मीं जर ती आचरलींत तर काही पुण्य नाही. पातकाचा मात्र संचय. तस्मात् ज्यांनी त्यांनी आपआपल्या धर्माप्रमाणे चालावें. तुझी या वैराग्यवृत्तीचा एकदम त्याग करा. घर्षणाने जसा अग्नि प्रदीप्त होतो तशी माझ्या भाषणाने तुमची वीर वृत्ति, तुमचे पूर्वीचे क्षात्रतेज, इत्यादि गुण प्रकाशमान होऊ द्या. तुह्मी श्री रामदासस्वामीचे चरणारविंदी लक्ष ठेवून त्या सद्गुरूची एकनिष्टपणे सेवा केल्यास तुमचे सर्वस्वी कल्याण होऊन तुमचे जीविताचें सार्थक्य होईल.