पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १०९ परमेश्वराच्या ठिकाणी अंतर पडत असेल तर प्रत्यक्ष आईबाप असले तरी त्यांचा सुद्धा संबंध तोडून टाकावा; मग इतरांची काय कथा ? प्रहादाने आपला बाप जो हिरण्यकश्यपू त्याचा त्याग केला. बिभीषणाने आपला बंधु जो रावण त्याचा त्याग केला. भरतानें श्रीरामचंद्रासाठी कैकेयी मातोश्रीचा त्याग केला. सांगावयाचे तात्पर्य इतकेंच की, तुझी माझा नाद आतां सोडून या- तुझी सुखाने घरीं जा. तुकाराम-(एकीकडे ) शाबास शिवराया शाबास. तुझें भाषण ऐकून माझी चित्तवृत्ति प्रसन्न झाली. गोरक्षनाथाप्रमाणे तूं श्री रामदास स्वामीचे शिष्यत्व करशील-तुझ्या अंगीं वैराग्य पूर्ण बाणले. देहाचे ठिकाणी उदास आहेस. आशापाश तुझ्यामागे राहिला नाहीं. श्री ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात की, जन्म आणि मृत्यु यालाच मी “संसार " म्हणतो, तो तूं जाळून टाकलास. आतां तुला मोठे राज्य प्राप्त झालें, अथवा तूं माठाले पराक्रम करून तुझी कीर्ति दिगंत झाली, तरी तूं जनकराजाप्रमाणे विदेही राहशील अशी माझी खात्री झाली. आतां याला क्षात्रधर्माचा उपदेश करावा, झणजे हा आपल्या मातोश्रीच्या आज्ञेप्रमाणे कार्यभाग करील. जिजाबाई-(एकीकडे) माझी अक्कल अगदी गुंग झाली. मला असे वाटले नव्हते की, तुकोबाचे उपदेशाने शिवबा इतका पालटेलइतक्या थोड्या अवधीत इतका पालटावा ! उपदेशाचा परिणाम किती जलद झाला पण! तुकाराममहाराजांनाच जर गोब्राह्मणांचा अभिमान नाही, तर मी तरी कशाला तळमळ करूं ? (उघड) आतां मी फार दिवस जगत नाहीं समजलास ! विजापुरास ही बातमी समजली ह्मणजे तिकडे मोठा शोक होणार आहे, याचा तुला काही तरी विचार आहेका ? राईबाई-(एकीकडे ) सासूबाईनी आपली पराकाष्ठा केली, पण उत्तरें कशी चोख येतात. त्यांना सुद्धा आता काय बोलावें तें सुचत १०