पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ - श्रीतुकाराम. आतां मला आई म्हणून तोंड भरून हाक कोण मारील ? मला नेहमी म्हणत होतास की, आई तूं माझें नऊ महिने ओझें बागवूम, असंख्य कष्ट सोसून मला लहानाचा मोठा केलास, रात्रंदिवस माझ्या अंथरुणावर बसून अहोरात्र जागरणे करून, जिवापाड कष्ट करून नानाप्रकारच्या दुखण्यांत औषधे देऊन तूं मला बरें केलेंस, अंगाचे अंथरूण केलेंस, योग्य मुरूकडून माझा विद्याभ्यास करविलास, मला सुख व्हावे म्हणून स्वतःचे जीवाकडे न पाहतां नानाप्रकारची संकटें भोगिलींस. आई मी तुझा कसामे उतराई होईन ? प्रत्यक्ष मी आपल्या अंगाच्या कातड्याचा जोडा करुन तुझ्या पायांत घातला, तरी तुझे उपकार फिटणार नाहीत. या सर्व भाषणाचा मला आज चांगला परिचय आला. आतां तुला मी जाऊ देणार नाही. (बाजूला उभी राहते.) शिवाजी-आई, हा देहही माझा नाही, आणखी हा वेशही पण माझा नाही. हे हात, पाय, डोळे हे माझे प्रत्यक्ष अवयव असून ते मद्धां वाटेल त्या वेळी मला सोडून जातील. माझ्या पाठीपोटी कोणी नसून एकटा मी अनेक दुःखप्रद जन्म घेऊन चौऱ्यायशी लक्ष योनी सारख्या फिरत आहे. दर जन्मीं आईबाप आहेतच. त्यांना म्हणन खंड नाही. पतंग जसा दिव्याला भुलतो, त्याप्रमाणे-मी आणखी माझें-यांत मी गुरफटून गेलो आहे. हजारों लोक आजपावेतों माझ्यापुढे निघून गेले, परंतु मरणानंतर त्यांचे काय झाले त्याची वार्ता सुद्धा नाही. तुकाराममहाराजांनी माझ्या डोळ्यांत अंजन वातले आहे त्यामुळे आजपावेतों में अदृश्य होतें तें आतां दिसूं लागले आहे. आतां त्रिकूटाच्या शिखरावर सुखाने निद्रा करीत आहे. त्रिगुणांचे वळसे आतां चुकविले. वित्त, गोत, स्त्री, पुत्र, माता, पिता, यांचीही मायावळ आतां तुटलेली आहे. सर्व प्रकारे निष्काम झालो आहे. सतरावी जी जीवनकला, ती प्राप्त होऊन तिने इच्छा पूर्ण केली. आणि ऊर्ध्व मुखाने सोहं शब्दाने मी परमेश्वराला आळवीत आहे. आई, तुकोबाचें असें ह्मणणे आहे की,