पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १०७ माझ्या सुनेस दिलेला आशीर्वाद पूर्ण करा. शिवाजीचे पोटीं अयाप संतान नाही. मराठ्यांच्या गादीची स्थापना होणे अशक्य आहे. गोब्राह्मणांचा आपल्यास अभिमान असला पाहिजे. तुकाराम-माझ्या अभिमानाने काय होणार आहे ? सर्वसाक्षी परमेश्वरास सर्व गोष्टी श्रुत असतात. त्याच्या इच्छामात्रेकरून सृष्टीची घडामोड होत आहे. त्याची इच्छा नसल्यास आपले प्रयत्न व्यर्थ होत. सईबाई-माझ्या बोलण्याकडे महाराजांचें लक्ष्य मुळीच नाहींसें दिसते. मला काय आशीर्वाद दिला तो ध्यानांतच नाही वाटतें तुकाराम-या मुलीने तर मला अगदीं कैचीतच पकडलें म्हणावयाचें. मुली, तुझ्या इच्छेप्रमाणे करणार पांडुरंग समर्थ आहे. सईबाई-पति विदेही असल्यावर पांडुरंग काय करणार हे मला कळत नाही. महाराजांचे पाण्यात बुडवून टाकलेले ग्रंथ तेरा दिवसांनंतर कोरडे निघाल्याचे आम्हाला आतांच एका म्हातायाने सांगितले. त्यानेच आम्हांस आपले पाय घट्ट धरण्यास सांगितले आहे. देवाने आपले ग्रंथ कोरडे काढल्याचा आपल्यास किती आनंद झाला आहे! अशा वेळी आह्मी दुःखांत असावें हैं आपणास योग्य दिसते काय ? तुकाराम-तुम्ही फार चतुर आहात. तुमचे बोलण्याचे मोठे कौतुक वाटते. बरे असो. आतां शिवाजीची माझ्याकडे येण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही क्षणभर बसा. तुमच्या देखतच मी आपल्याकडून त्याला चार बोधाच्या गोष्टी सांगून पुनः त्यास संसारांत घालण्याचा प्रयत्न करून पाहतों. (तुकाराम बाजूस उभा राहतो. शिवाजी प्रवेश करितो. आश्चर्यचकित मुद्रे उभा राहतो.) जिजाबाई-(शिवाजीच्या गळ्यास मिठी मारून ) बाळा शिवबा, मला सोडून तुला अरण्यांत जाववलें तरी कसे ? अरे, माझी आज्ञा वेतल्याशिवाय तूं कधीं घराचे बाहेर पाऊल सुद्धा टाकलें नाहींस, असे असून आतांच मजविषयी इतका निठुर कसारे झालास !