पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ श्रीतुकाराम. क्रोश करीत धावत धांवत यमुनेपावेतों आली. सर्वत्रांस वाटलें की, आतां ही जीव दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु डोहाजवळ आल्यावर जीव न देतां डोहाचे अलीकडेच तिनं धरणीवर अंग टाकिलें. ही तिची अवस्था ! मग आपण तर माणसेंच आहोत. शिवाजी कांही पाण्यात बुडाला नाही. तो जिवंत असून सत्कार्थी जर आपला देह लावीत आहे, तर तुझी त्याला पुनः संसाररूपी जाळ्यांत कशासाठी गुंतवितां ? तुह्मी त्याचे कोण आणि तो तुमचा कोण ? तुह्मी विनाकारण दुःख कां करितां ? जिजाबाई-झाले. तुमच्यावर आमचा मुख्य भरंवसा. तुम्हीच असं बोलूं लागला तर मला माझ्या मुलाची आशा उरली नाही. माझ्यावर आकाशच कोसळलें म्हणावयाचे. साधुसंगतीने फार सुख होते म्हणतात, त्याचा मला अनुभव आला. व्यर्थ, व्यर्थ मी महाराजांकडे आले. सईबाई-असें होतें तर मला पुत्रवती भव असा कसा आशीर्वाद दिला ? महाराजांचे बोलणे असत्य होणार नाही. खरे की नाही रंगू? तानाजी-बाईसाहेब, असें मनांत आणूं नका. महाराज केवळ आपले सत्व पहात आहेत. रंगू-माणसाचं मेलें जीव जाईपावेतों सत्व पहाणे हे कांहीं साधूस उचित नाही. गंग-आपण कशालाग मध्ये तोंड घालावें. आपली किंमत काय, हे आपण ओळखावें. पंडितराव-तानाजीराव विनाकारण वेळ घालविण्यांत अर्थ नाही. आपण महाराजांचा अरण्यांत जाऊन पुनः तपास करूं. मग आपल्यास में उचित दिसेल तसे करूं. तुकाराम-पंडितरावांची कल्पना उत्तम आहे. तुझी सर्व त्यांना गांठा. तुमच्या ह्मणण्यावर ते काय ह्मणतात ते पहा. जिजाबाई-महाराज, असें उडवाउडवीचे भाषण आपण कां करितां बरें? आह्मी आपल्यास शरणागत आहों. आपण आतां या