पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १०५ कापली, सगळ्या जनाने माझी निंदा केली तरी तुला शीण होईल असें संकट मी कधी घालणार नाही. माझा अधिकार काय ? आणखी मी अन्नपाणी वर्ज करून तुला सांकडे घातले काय ? श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी पशुमुखाने ऋग्वेद बोलवून सगळ्या जनाला जसें चकित केले तसें तूं आज अनिर्वाच्य कृत्य केलेंस ! असे कृत्य मागेंही झाले नसेल, आणखी पुढेही होणार नाही. सातारा-मटले मला थोडे बालूं देतां काय ? आपणच सारखी टकळी चालवितां. लोक आतां असें ह्मणतात की, तुमच्या वह्याकरितां श्रीपांडुरंगाने हा एक अकरावा अवतार धारण करून तुमच्या वह्या आपल्या मस्तकावर कोरड्या धरिल्या होत्या. लोकांनी त्या आतां वाजतगाजत पालखीत मिरवत तुमच्याकडे आणल्या आहेत. तुकाराम-पांडुरंगा, तुला मी आतां काय देऊ ? तुझ्या नामावरून हा माझा देह ओवाळून टाकतो. चला आजोबा, आपण आतां कीर्तनास उभे राहणार. मातारा-अरे पण, तेरा दिवसांत अन्नाचा लेश तुझ्या पोटांत नाही याचा काही विचार.. तुकाराम-तहानेला तहान पिऊन गेली, भुकेला भूक खाऊन गेली. पांडुरंग माझ्या हृदयांत वास करीत असल्याने माझी तहान, भूक हरून गेली. ( मातारा जातो. जिजाबाई, सईबाई, तानाजीराव, पंडितराव, रंगू, गंगू, प्रवेश करितात. सर्व तुकारामास नमस्कार करितात. सईबाईस पुत्रवती भव असा तुकाराम आशीर्वाद देतो) जिजाबाई-महाराजांचे चरणापाशी विनंती आहे की, शिवाजी. आमचा सर्वांचा त्याग करून घरादाराचा त्याग करून विदेही होऊन अरण्यांत फिरत आहे. त्याला कृपा करून आपण संसारांत घालावें, नाही तर आमचे सर्वांचे प्राण निघून जातील. तुकाराम-यमुनेचे डोहांत श्रीकृष्ण बुडाले, त्यावेळी यशोदेने यमुनेंत उडी घालून जीव देण्याचा निश्चय केला. मोठ्याने आ