पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ श्रीतुकाराम. रामेश्वर-मला तुमचा उपदेश मानवला. पण माझ्या या शरीरावर हे असे ओले कपडे अ द्या. तुझी पाण्याची गळती धरा, नाहीं तर मी ठार मेलोंच म्हणून समजा ! अरे देवा, आतां मी काय करूं? ( रामेश्वर भटाच्या अंगावर पाण्याची गळती धरून सर्व जातात.) c प्रवेश २रा. Mail A स्थळ-देहू येथील विठोबाचे मंदिर. ( तुकाराम निजलेला आहे. म्हातारा प्रवेश करतो.) मातारा-अरे तुकाराम. अरे तुकाराम. तुला मी अति आनंदाची एक बातमी सांगतो. तूं कष्टी होऊ नकोस. तुझ्या वह्या श्रीपांडुरंगाने इंद्रायणीच्या डोहांत कोरड्या ठणठणीत ठेवल्या आहेत. तुकाराम-( जोराने उठून उभा रहातो. ) काय माझे अभंग इंद्रायणींत कोरडे ! खरोखर ते अभंगच आहेत. अहाहा पांडुरंगा, मी तुझा मोठा अन्याय केला. तुला मी व्यर्थ दोष दिला, आणखी तेरा दिवसपावेतों प्राण निघून जावा ह्मणून डोळे झांकून या दगडावर निजलों. आजोबा, मला या काली किती आनंद झाला आहे ह्मणून सांगू! तुह्मी मला पांडुरंगस्वरूपी दिसतां, तुह्माला मी लोटांगण घालतो. आज हा तुकाराम सात समुद्र आपल्या या वीर बाहंनी पोहून गेला. उपमन्यूला क्षीरसागर, ध्रुवाला अढळपढ, सुदामाला सुवर्णपुरी, अथवा सती द्रौपदीची कौरवसभेत जशी लाज राखलीस, तशी या तुकारामाची तूं आज मनकामना पर्ण केलीस. तं आपलें बीद खरें केलेंस. आजपावेतों निरापेक्षबद्धीने तुझी एकनिष्ठपणे सेवा केली, त्या तुला आज संकट वालन तेरा दिवस पाण्यांत उभा करून मी आपल्याला काळिमा लावून घेतली. आजपासून माझी कोणी जरी चरा चरा मान