पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. 9 प्रस्तुत नाटकांतील बहुतेक भाग इतिहासाला धरून आहे, परंतु कचित् स्थळी नाटकाला विशेष गोडी आणण्याकरितां ग्रंथकांत पदरची भर घालावी लागली आहे, व स्थलविशेषी इतिहासांतील गोष्टी मागे पुढे कराव्या लागल्या आहेत. हे नाटक आमी केवळ नाट्यकलाभिज्ञ जी शाहुनगरवासी नाटकमंडळी यांच्या गुणावर लुब्ध होऊन त्यांच्याचकरितां रचिलें आहे. आमी केलेल्या कृतीचा त्यांनी प्रेमभावाने स्वीकार केला व देशभाषेची आणखी सेवा आमचे हातून घडावी म्हणून उत्तेजनार्थ त्यांनी आम्हांस हस्तेपरहस्ते अनेक गोष्टींनी मदत केली, याबद्दल आम्ही आभार प्रदर्शित करतो. आर्यभूषण छापखान्याचे मालकांनी आमचे नाटक विशेष काळजी घेऊन फारच लवकर व मनाप्रमाणे छापून दिले याजबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आमचे मित्र रा. रा. गणेश विष्णू चिपळूणकर, भोरकर आणि कंपनीचे म्यानेजर, यांनी या नाटकाची हस्तलिखित प्रत वाचून पाहताच त्यांचा असा ग्रह झाला की, असें भक्तिरसाने परिप्लत नाटक छापून त्याचा प्रसार सर्वत्र झालाच पाहिजे. ग्रंथ छापण्यास लागणाऱ्या खर्चाचा बोजा त्यांनी सर्वप्रकारे आपल्या शिरावर घेतला, या त्यांच्या उदार कृतीबद्दल ग्रंथकर्ता त्यांचा फार फार ऋणी आहे. ग्रंथ शेवटास जाणे हे ईश्वररूपेचें फळ आहे. ग्रंथकर्तृत्वाचा मीपणा मिरविणे व्यर्थ होय. शेवटी सुज्ञ वाचकांपुढे एवढेच म्हणणे आहे की:काय म्यां पामरे बोलावीं उत्तरें ॥ परी त्या विश्वभरे बोलविलें। (श्री तुकाराम.) मुक्काम पुणे पेट कसबा ) ( वासुदेव रंगनाथ शिरवळकर, घरनंबर २१० तारिख १० सप्तंबर, सन १९०१ इ.)

  • देशभाषेचा आभिमान बाळगणाऱ्या ज्या सद्गृहस्थांनी आपला अमोलिक वेळ खर्च करून आम्हास अनेक त-हेनें प्रस्तुत

ग्रंथकता.