पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १०३ काय उत्तम उत्तम यति आहेत त्यांच्या नुसत्या नामस्मरणाने आपला देह पुनीत होऊन आपण उद्धरून जाऊं. ( रामेश्वरभटाच्या आरोळ्या ऐकू येतात.) । रामेश्वर-( मोठ्याने ) अरे बापरे ! सर्व अंगाचा डोम झाला! मेलों! मेलों ! ठार मेलों ! ! या झन्यांत स्नान मात्र केलें, पाण्यांतून बाहेर आल्याबरोबर सर्वांगावर जसा विस्तव ठेवला आहे ! आतां मी काय करूं ! पाण्यांत गेलें ह्मणजे थंड वाटते. पाण्यांतून बाहेर आलों की, माझे पंचप्राण व्याकूळ होतात ! देवा, आतां काय करूं ! अहो यतिमहाराज, व्यर्थ व्यर्थ त्या फकीराला आपण त्रास दिला ! तो कोणी तरी सिद्ध पुरुष असावा ! नाही तर मोठा मांत्रिक तरी असला पाहिजे ! मी ब्राह्मण, जातीचा श्रेष्ठ, परंतु त्याने मंत्राने माझ्या शरीराला आग लाविली ! माझे शरीरावर पाण्याची गळती धरा ! मला पाण्यांत बसवा ! आतां कोणाला शरण जाऊं ? माझी पीडा दूर होते कशी? सदानंद-पण असें झालें कसें ! जे आहे ते आपण ब्राह्मण, श्रेष्ठ, आम्ही पवित्र संन्यासी तुमच्याबरोबर, मग असे असून त्याचा मंत्रप्रयोग चालावा तरी कसा ! आतां त्याला शरण जावें तर आपल्याला कमीपणा येतो. आपण त्याच्याशी व्यर्थ तंटा केला. यत्किंचित् पाण्याची गोष्ट ! त्याने आपणाला पुष्कळ समजावून सांगितले, पण आपण कांहीं ऐकिलें नाहीं. लागलीच एकेरीवर आलो. आज मुंगीनें मेरूचे उल्लंघन केले म्हणायचे.. नित्यानंद-(एकीकडे ) आतां आमच्या पुडीची काय वाट । रामेश्वरभट तर पांचजन्य करण्याचे बेतांत आहेत. आतां काय करावें ! अगोदरच मला भूक लागली होती. आतां तर जास्तच लागली. ( उघड ) काही हरकत नाहीं जे आहे तें. चला आपण श्रीक्षेत्र आलंकापुरास जाऊं. तेथे श्री ज्ञानेश्वरमहाराज प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार आहेत. तेथे जाऊन उपास करूं. तेथे दृष्टां- ताने जशी आज्ञा होईल त्याप्रमाणे करूं.