पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उडदि बुडदि माई गदी १०२ श्रीतुकाराम. होते. मला असे वाटते की, मी किती मूर्ख ! मी यत्किंचित् कारणासाठी तिच्यावर रागावलों काय ? संन्यास घेतला काय ? आणखी आतां अहोरात्र जागरणे करीत बसलों काय ? सदानंद-पण जे आहेत्ते, बायकोवर रागावयाचे कारण झाले तरी काय ? मला एकदां सांग पाहूं.. नित्यानंद-कांहीं नाहीं ! मला सांगण्याची सुद्धां शरम वाटते. सदानंद-माझ्याजवळ सांगण्याची कसची शरम आली आहे? तुही आम्ही आपले बोके संन्यासी ! नित्यानंद-अहो, काय सांगावें, जे आहेत्ते दर साल बाळंतपण! गरोदर राहिली की पारठे मूल आपलें अवथणायचेच. सगळ्या वांत जे आहेत्ते त्याने शौच्याला बसायचे. एक दिवस मी उन्हाच्या वेळेस अगदी तापून बाहेरून आलो. अगोदर भुकेने संतापलेला, त्यांत जे आहेत्ते, माझा पाय भरला, मी घसरलोन पडलों. मला अतिशय क्रोध आला. बायकोला खूप मारले. तसाच रागें रागें मठांत गेलो आणि संन्यास घेतला. आतां रात्रीच्या रात्री दुःखांत काढतों आहे. पण काय उपाय ? बरे पण तुला संन्यास व्यावयाला काय निमित्त झाले ? सदानंद-मला ह्मणतोस होय ! जे आहेत्ते तुझें कारण पुष्कळ बरें. तूं बायकोवर तरी रागावलास. मी तर फारच मूर्व. मी पहिल्यापासून बाहेरख्याली. बाहेर चैन मारीत असतां आमच्या अंगवस्त्राकडे दुसऱ्याने संधान लावले. ते आमच्या कानावर येऊन आमची आणि त्यांची मारामारी झाली. त्यांत तिने त्याची बाजू धरली. याबद्दल आमाला संताप येऊन कोणत्याच स्त्रीचे आता मखावलोकन करावयाचे नाही असा निश्चय मनांत करून आमी वरीं सुद्धा न जातां एकदम संन्यास घेतला. नित्यानंद-हर हर !! आपण संन्यास घेऊन संन्यास या पवित्र शब्दाला आणखी संन्यासवृत्तीला काळीमा मात्र आणली ! सदानंद-श्रीक्षेत्र वाराणशी, पंचवटी, रामेश्वर इत्यादि स्थळी