पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १०१ शापाने आह्माला पीडा होऊ लागली तर काजव्याच्या तेजापुढे सूर्याचा प्रकाश फिक्काच पडला ह्मणावयाचा. चला, आतां जाऊन मी स्नान करितो. (पाण्यांत शिरतो.) सदानंद-प्रातःस्नान क्षेत्राच्या ठिकाणी फार उत्तम होतें. नाशकास गंगेच्या काठी किंवा वाईस रुष्णेच्या कांठी, भिल्लवडी औदंबर इत्यादि ठिकाणी प्रातःस्नान करून स्नानसंध्येत कालक्रमणा करणे फारच सुखकर वाटते. परंतु काय करावें एक्या ठिकाणींच वास्तव्य केलें तर जे आहे तें पुडीची पंचाईत पडते. नित्यानंद-आपल्याला जेथें तेथें पुडीचीच तर पंचाईत पडते. नाही तर आपण आपला पुष्कळ वेळ परमार्थसाधनाकडे घालविला असता. आतां रामेश्वरभटाकडे तरी जे आहे ते आपण किती तरी दिवस भोजनास जावें ? आपल्या मनाला आतां संकोच वाढू लागला आहे. इतर ब्राह्मण जें आहे तें श्राद्ध आहे, पक्ष आहे, हव्य आहे, जे आहे ते कव्य आहे, हवे तिकडे जातात, विपुल, जें आहे तें, दक्षणा मिळते. पण आमी काय बोलूनचालून संन्यासी. आह्मांला कोण बोलावतो ? खरेच सांगू का मला असे झाले आहे की, या संन्यासाच्या पंचाटींतून कोणी सोडवील तर बरें. सदानंद-आतां बाबा या संन्याश्यांच्या दीक्षेतून कोण मुक्त करणार ? माझें मन सुद्धा तुझ्याप्रमाणेच चंचल झाले आहे. इतर ब्राह्मणांना मिष्ट मिष्ट पदार्थ, ह्मणजे बासुंदी, पुया, लाडू, जिलबी, केशरी भात खातांना पाहून माझ्या तोंडास पाणी सुटते. लोक काय संसारांत राहून चैन मारतात ! सुंदर सुंदर स्त्रिया, संपत्ति, संतती, जे आहेत्ते मोठमोठाले वाडे, जे आहेत्ते बसायला घोडे, आझाला काय आहे! आमचे तेवढे कपडे मात्र भगव्या रंगाचे, आह्मी नेहमी उपास करावेत, जे आहेत्ते चांद्रायणे करावीत. एकभुक्त असावे, कारण कामवासना उत्पन्न होता कामा नये. बाकी ती व्हावयाची ती होतेच. नित्यानंद-मला तर माझ्या प्राणप्रियेची क्षणोक्षणी आठवण