पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उडवि बुडवि श्रीतुकाराम. केवळ अवतार अशा मांडव्य ऋषीला सुळावर चढविलेंस ! कां तर त्याने लहानपणी एक भुंगा कांटा टोचून मारला. यज्ञाचे ठायीं ऋषिजन तुला अवदान देतात तिथे काळें तोंड करतोस, आणखी गोकुळांत घरोघरी जाऊन बायकांची दारे उघडून लोणी चोरून खातोस. तस्मात् धिःकार असो अशा देवाला. अरे दुष्टा, शेंडीला दोरी बांधून जागरणे करून भक्तिपूर्वक मी तुझें ज्यांत वर्णन केले, ते माझे अभंग पाण्यात बुडवून तुला काय मिळाले. विनाकारण तं मला खेद उत्पन्न केलास. माझे लेखी देव मला ॥ असो त्याला असेल ॥१॥ गोष्टी न करी नांव ने घे ॥ गेलो दोघे खंडोनी ॥२॥ स्तुतिसमवेत निंदा ॥ केला धंदा उदंड ॥३॥ तुका ह्मणे निवांत ठेलों ॥ वेचित आलो जीवित्व ॥४॥ काय तें वाळवंटीचे सुख ! ज्या वाळवंटांत वैष्णवांनी खेळ मांडला आहे, कामक्रोध पायाखाली तुडवून टाकले आहेत, जेथें एकापेक्षा एक बळी “ कळी काळावर बळकट कास कसून उभा आहे.” अहाहा काय अनुपम्य सुखसोहळा मला वाटत होता ! पण हा भ्रमरे भ्रम. ज्या नामामृताच्या आनंदकल्लोळांत देहाची शद्धि जाऊन जेथें पंडित, ज्ञानी, योगी, महानुभव, सिद्ध आणखी साधक वर्णाभिमान विसरून जाऊन एकमेकाला लोटांगणे घालतात, सर्वांगाला गोपीचंदनाची उटी लावलेली असते. ज्यांच्या गळ्यांत तुळशीच्या माळा मिरवत असतात, टाळमदंगाची घाई उडून गेली असते, ज्या ठिकाणी सुरनर पुष्पांचा वर्षाव करीत असतात, कठोर अंतःकरणे जेथें लोण्याप्रमाणे मद होतात, आणि जेथें पाषाणाला सुद्धा पाझर फुटतात, असे मी लाखों लोकांना सांगत आलों, पण तो सारा भ्रम ! ते सुख या तुकारामाचे कपाळी नाही. हाय हाय ! धिक्कार ! (जमिनीवर आंग टाकून देतो.) TEE अंक था समाप्त.