Jump to content

पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. ९५ संपत्तीला शिवला नाहींस, घरादाराला झुगारून देऊन घरावर तुळशीपत्र ठेवलेंस, ब्राम्हणाला सर्वस्वी मत्ता अर्पण केलीस, आळंदीपंढरीच्या वाऱ्या करून पाय झिझविलेस, रात्रंदिवस मुखाने त्या काळ्याचें विठ्ठल विठ्ठल म्हणून भजन केलेंस, संसाराला तिळांजली दिलीस, कोधाचा उपयोग इंद्रियदमनांत केलास, लोभाचा उपयोग तीर्थप्रसादाकडे केलास, सज्जनांचा मोह धरिलास, आणखी केलेंस काय, तर त्या विठोबाच्या स्तुतिपर लाखों अभंग केलेस. पण त्याला तुझी दया आली काय ? त्याने तुझे ग्रंथ तुकाराम-हां बस्स बस्स. जास्त बोलू नका तुमच्या बोलण्याचा माझ्या हृदयांत पूर्ण प्रकाश पडला. व्यर्थ ! व्यर्थ ! मी या भूमीला भार झालो. व्यर्थ मी त्या देवाचे पोवाडे गायिले. हाय रे दैवा ! मग हा सर्व भ्रम कारे! का पिशाच्च ! काय ? म्हणूं तरी काय ? झातारा-काय म्हणतोस ? जीव दे जीव. एवढाले ग्रंथ लिहिलेस, त्या तुला हे असें बक्षीस मिळाले आहे. माझ्यासारखा असता तर त्या विठोबाच्या नांवानें जोत्याशी टक्कर घेऊन प्राण सोडता. (जातो.) तुकाराम-हे पांडुरंगा, तूं महा निष्ठुर आहेस. तुला दया माया कांहीं एक नाही. यमनियम, पापपुण्य सर्व आमच्या मागे लाविलेली आहेत, पण तुझ्या घरी कोणता न्याय रडतो आहे ? बिचान्य हरिश्चंद्राचे सर्व वैभव हरण करून त्याचा पुत्र रोहिदास आणि त्याची स्त्री तारामती यांना डोंबाघरी गुलाम बनविलेंस. नळदमयंतीची ताटातूट केलीस. चक्रवर्ती शिबी राजा, दयेची केवळ मूर्ति, त्याच्याकडून त्याचेच मास काढून तोलून घेतलेंस, कर्ण वीर घायाळ होऊन रणांगणी पडला असता त्याचे दांत पाडून घेतलेस. अत्यंत उदार बळी, त्याला पाताळी दडपलास. श्रियाळाचें बाळक त्याच्याकडून करवताने कापविलेंस. प्राणांत होईफावेतो ज्याने राम राम असा सारखा उच्चार केला, त्या दशरथाला प्रत्यक्ष बापाला-अधःपात ! सकल तीर्थांचा आणि मंत्रांचा