पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. 1 उडविले, तेथे इतरांची कथा काय ? अभंगाच्या वह्या पाण्यांत बुडविल्याबद्दल, परमेश्वरा, माझ्या मनाला खेद होऊ देऊ नको. हेच तुझ्याजवळ रात्रंदिवस मागणे आहे. या गांवच्या लोकांनी माझी अगदी पाठ पुरवली आहे. त्यांतून या म्हातान्याने तर अगदी कमाल केली. आलाच तो. (एक म्हातारा प्रवेश करतो.) म्हातारा-तुकारामबुवा, तुम्हाला मी लहानपणापासून पहात आहे. तुमच्याविषयी माझा मोठा पूज्यभाव होता. तुम्हाला मी अत्यंत शहाणा समजत असे, मोठा साधु समजत असे. परंतु मला आतां तुमच्यासारखा मूर्ख या जगांत कोणी दिसत नाही. . तुकाराम-कसे म्हणतां आजोबा ? माझ्यासारखा मूर्ख ! . म्हातारा-अरे तर गृहस्था, तूं आपली खतें पत्रे पाण्यात बुडवलीस. मी म्हणतों काही हरकत नाही, त्यांत तुझी सात्विकवृत्ति दिसून आली. पण अभंगांच्या वह्या तूं पाण्यात बुडवून टाकल्यास ? यांत काय पुरुषार्थ केलास ! आजपावेतों स्वार्थ तर बुडविलास; पण आतां परमार्थही बुडविलास. तुझा देव भक्तासाठी मोठा धांवण्या धांवणारा आहे, मग वह्या कशारे पाण्यांत बडाल्या ? तस्मात् तुझ्या अभंगांत ईश्वरी प्रसाद मुळीच नाही. काशींतल्या पंडितांनी साधु एकनाथाचें भागवत भागीरथींत फेकून दिले होते. ते जसें भागीरथीने हात वर करून झेलले, तसे तुझे अभंग इंद्रा यणीने कां नाहीं झेलले ? आजपावेतों तूं व्यर्थ त्या देवाची -स्तुति केलीस. त्या देवांत देवपण नाहीं समजलास ? तुकाराम-वह्या बुडवल्याबद्दल हा वेळपावेतों मला यत्किंचित सुद्धा वाईट वाटले नव्हते. पण मला तुमचे म्हणणे आतां कांहीं अंशी खरे दिसते. म्हातारा-कांही अंशी का ह्मणतोस ? माझें मणणे अक्षरशः खरे आहे. रात्रंदिवस कष्ट केलेस, सुखाची झोप घेतली नाहींस, मुलाबाळांना कधी डोळाभर पाहिले नाहींस, नेहमी उदास राहिलास, मलिन वस्त्र धारण केलींस, जगाचा वीट मानलास,