पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर ८२ ९२ श्रीतुकाराम. तोप निव आपल्या घरी. ( धक्का देतो, ) तुझा माझा काय संबंध ? सईबाई मूर्च्छित पडते. शिवाजी निघून जातो. जिजाबाई, रंग, गंगू, पंडितराव व तानाजीराव प्रवेश करितात.) जिजाबाई-अरे, आतां धाडकन येथे काय बरें पडलें ? रंग-अहो, या पहा बाईसाहेब, याच आतां धाडकन जमिनीवर आपटल्या बरं का ? (जिजाबाई तिला मांडीवर घेते.) गंगू-यांना पडण्याला कारण काय बरे झाले असावें. तानाजी-यांची आणखी महाराजांची गांठ पडली असावी, महाराजांनी यांच्या मनाला लागेल असे काही तरी खोंचन बोललेले असावे असा माझा तर्क धांवतो. - पंडितराव-हा येथे खंजीर कसला पडला आहे बरें ? जिजाबाई-काय करावें या आमच्या दुर्दैवाला ? देवाने माझ्या कपाळी आणखी काय काय सोहळे लिहिले आहेत कोण जाणे ? मली, मुली, ( तिजला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करिते. सईबाई शदीवर येते.) म्हटले तुझी आणखी बाळाची गांठ पडली होती का ? (ती मानेने होय म्हणून सांगते.) मग तो कोणीकडे गेला ? केव्हां गेला ? तुला काय म्हणाला ? त्याला माझी आठवण आहे काय ? घरच्या माणसांचें कांहीं नांव काढलें कां! सांग. सांग. मईबाई-कांहीं नाही. त्यांना कोणी नको. कोणाची गरज नाही. निशान सांगणे झाले की, तुम्ही माझी आशा सोडा. तेव्हां मी म्हटले की, या खंजिराने माझा आपल्या हाताने निकाल करून जा तेव्हां तो रागेंरागें फेंकून दिला, आणखी या पलीकडच्या झाडीत झपाट्याने निघून जाणे झालें. तानाजी-आईसाहेब चला आपण तेथे शोध करूं; नाहीतर तसेच तुकारामबुवाचे घरीं जाऊं; कारण रात्री तेथें कीर्तनाकरितां खात्रीने स्वारी ठेवलेली. (सर्व हळूहळू जातात.)