पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. केलेत ? आतां इकडचा एक एक शब्द मला विजेच्या कडकडाटासारखा वाटत आहे. आता मी इकडचे पाय सोडून कुठे जाणार नाही. माझी मान तोडली तरी हरकत नाही. तुकाराम बुवांनी नाहीं का संसार केला ? मग त्यांना नाहीं कां मुलें लेकरें झाली. ते तरी आपल्या बायकोला वागवितात की नाही ? शिवाजी- तुकाराम संसारांत असून अलिप्त आहे. आरशामध्ये आपण आपले मुख पाहिले असतां आपल्यास दिसते, परंतु आपणाला पक्के ठाऊक असते की, आपण आरशांत नाही. सरोवरामध्ये चंद्र, सूर्य यांची प्रतिबिंब दिसतात, त्या प्रतिबिंबांच्या योगानें उदक सुद्धा प्रकाशमान भासते; परंतु खरोखरीचे चंद्रमूर्य हे आकाशांतच आहेत. त्याप्रमाणे तुकाराम संसारांत असून अलिप्त आहे. तसा मार्ग इतर कोणाचेच हातून होणार नाही. कनक, कांता आणि पुत्र यांचा आझांला क्षणांत मोह उत्पन्न होईल. म्हणून इंद्रियांचे दमन करण्याकरितां आम्हास वनप्रयाण केले पाहिजे. मला सर्वत्रांचा वीट आला आहे. मी आतां येथून तीर्थयात्रेस जाईन. बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करीन. काशीहून रामेश्वरास भागीरथीच्या कावडी नेऊन वाहीन. वाटेल तें मी करणार. तुमचा मला आतां पाश नको आहे. आणखी या पुण्य मार्गाच्या आड तुह्मीही पण येऊ नये... - सईबाई-एक तर मला बरोबर न्यावें, नाहीतर या हातांनी माझा निकाल करून हवे तिकडे निघून जावें. मी कांहीं आतां हे पाय म्हणून सोडणार नाही. मी बरोबर येणार... शिवाजी-मी येऊ देणार नाही. कशी येतेस ते पाहतों. सईबाई-काय कराल ? ठार मारालना ? हा व्या खंजीर, मी तरी त्याचीच वाट पाहत आहे. अशा प्रकारे प्रत्यक्ष पतीच्या हातून मृत्यू आला, तर माझ्यासारखी भाग्यवान कोणीच नाही. हं, आटपा लवकर, करा एका घावी दोन तुकडे. शिवाजी-(तिच्या हातची कट्यार घेऊन फेंकून देतो.) जा