पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तोपा (अ FFFFF श्रीतुकाराम. णाचे भाषण मला आजपावेतों कधींसुद्धां बोलणे झाले नाही. काय ह्मणे, तूं कोण आणखी मी कोण ? तुकारामबोवांनी आपल्या संसाराप्रमाणेच, माझ्या संसाराचे वाटोळे केलें म्हणावयाचे. हे भाषण जर सासूबाईनी ऐकिलें तर त्यांच्या मनाला किती तरी दुःख होईल त्याची कल्पना तरी आहे का इकडे ? शाम शिवाजी-त्यांत काय आहे ? माझ्या मनांत कांहीं कोणाला दुखवावें असें नाही. पण तुह्मी होऊन दुःख करूं लागलांत तर त्याला माझा काय उपाय आहे ? तुह्मी आपल्या देहाचें सार्थक करा. आजपावेतों तूं, मी अगदी तुझा जीव की प्राण असें मला प्रेम दाखवून, माझें चित्त हरण करून घेतलेस. स्वारी शिकारीवर असतांना सुद्धा मला तुझी आठवण होऊन कधी कधी माझें मन चंचल होई. आजपावेतों तुला देह विकला होता. आजपावेतों तुझ्याकरतां परमार्थ बुडविला, पण आतां मी तुझा नाही. इतर जन ज्याप्रमाणे बायको मेली असतां तिचे प्रेत मांडीवर आडवें घेऊन “ संसार बुडाला ", " संसार बुडाला " म्हणून धडा धडा कर बडवून घेतात, त्यांतला मी नाही. तुझ्याकरितां मला किंचित् सुद्धां वाईट वाटत नाही. सईबाई-अस्सं अस्सं काय ? त्या दिवशी माझ्याकरितां फुलांचे गजरे कोण करीत होते ! माहेराहून येण्याला एक दिवस उशीर लागला म्हणजे सांडणीस्वारावर सांडणीस्वार कोण पाठवीत होते ? माहेरी गेलीस म्हणजे मला चैन पडत नाहीं असें कोण बत होते ? आपण जोडप्याने श्रीरामदासस्वामीचे दर्शनास जा असे कोण म्हणत होते ! आणखी असल्या प्रेमाच्या झाडाला अशी विषाने माखलेली फळे आणलींत ? (दुःखाने ) बायकांची जात गाईसारखी आहे ! आमचा असा त्याग केलांत तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पहावें ? पुत्र झाल्याशिवाय स्त्रीचे ऋणांतून मक्तता नाही अशी शास्त्रमर्यादा आहे. माझ्या मनाला इतकें दुःख 'आजपावेतों कधीं दिलेले नाही, मग आजच कां इतकें कठोर मन