पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. शिवाजी-अजून कां बरें ही शुद्धीवर येत नाहीं ! भुकेनें आणखी तहानेने अगोदरच प्राण व्याकूळ झालेला, या प्रखर उन्हांतून हिंडून हिंडून ही अधिक थकली, आणखी कड्यावरून खाली बेशुद्ध पडली. ( नाडी पहातो.) नाडी अगदी मंद चालते आहे. श्वासोच्छास किंचित् वाहतो आहे. या वेळेला काय उपाय करावा ? किंवा अशीच सोडून देऊन चालतें व्हावें? तुकारामाने सांगितलेल्या ब्रह्मज्ञानाची ही कसोटीच आहे ? ते काय बरें ह्मणाले? न करीरे संग राहे रे निश्चळ ॥ लागो नेदी मळ ममतेचा ॥१॥ या नांव अद्वैत खरें ब्रह्मज्ञान॥ अनुभवावांचून बडबड ते ॥ २ ॥ एकीकडे मायापाश खेचतो आहे, एकीकडे विवेक ओढतो आहे. पण नाही. हा मायापाश ताडकन् तोडून हा मी अस्सा निघून जाणार. सईबाई—( उठून बसते.) अस्सा माणसाचा विश्वासघात करावा काय ? उभाउभी तुकाराममहाराजांचे दर्शन घेऊन येतों म्हणून सांगणे झाले; तीन दिवस गेले, चार दिवस गेले, पत्ता नाही, म्हणून सासूबाई आणखी मी शोध करण्याकरितां देहस आलों, तो आह्मांस बातमी लागली की, संसाराचा वीट येऊन, सर्व गोष्टीचा त्याग करून डोंगरांत जाणे झाले आहे ह्मणून. देवाच्या कृपेने आतां गांठ पडली, आतां ह्मणून सोडावयाची नाही. आतां अगोदर घरीं चलायचें ना ? शिवाजी. कोणाचें घर, कोणाचें दार, तूं कोण, आणि मी कोण ? आतां मला कोणी नको. आजपावेतों मला मायापाशांत गुंतवून खूप फसवलेत. आतां माझें मला स्वहित चांगले समजावयाला लागले समजलांत ? सईबाई-अग बाई ! काय तरी कठोर भाषण हे. असें निष्ठुरप